नवी दिल्ली | भाजपकडून राज्यसभेच्या ११ उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज (११ मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताच अवघ्या काही तासाच ज्योतिरादित्य शिंदेंना मध्य प्रदेशाकडून उमेदवारी जारी केली. या यादीत मध्य प्रदेशातील एक आणि महाराष्ट्रातील दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात महाष्ट्रातून भाजपने उदयनराजे भोसले आणि आरपीआयएचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली.
BJP announces the names of party's candidates for the upcoming election to the Rajya Sabha. https://t.co/sQItPuDotq pic.twitter.com/FAjziadv2Q
— ANI (@ANI) March 11, 2020
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान उदयराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीबरोबर सातार लोकसभा पोटनिवडणूक घेण्यात आली. मात्र, यात उदयनराजे भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागला. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील हे विजयी झाले.
उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवरून महाराष्ट्रात मोठा खल झाला होता. उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला संजय काकडे यांनी विरोध केला होता. तर उदयनराजे यांना उमेदवारीसाठी स्वतः माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली होती. दुसरीकडे महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचेही नाव राज्यसभेच्या उमेदवारीसाठी चर्चेत होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.