HW News Marathi
महाराष्ट्र

महात्मा गांधींविषयी ‘ते’ वक्तव्य भोवलं; अखेर कालीचरण महाराजला अटक

मुंबई | महात्मा गांधींविषयी अपशब्द उच्चारणाऱ्या कालीचरण महाराजाविरोधात छत्तीसगड आणि महाराष्ट्रात गुन्हे दाखल करण्यात आले होते. सर्व स्तरातून कालीचरणला अटक व्हावी, अशी मागणी होत होती. त्यानंतर आता मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील बगेश्वरी धाम येथून छत्तीसगड पोलिसांनी कालीचरण महाराजाला अटक केली आहे. आज (३० डिसेंबर) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

कालीचरण महाराजाने आपल्या भाषणात महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. अनेक ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर कालीचरण महाराजाने न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. काल (२९ डिसेंबर) या अर्जावर अकोला न्यायालय येथे सुनावणी झाली असून न्यायालयाने कालीचरणचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. दरम्यान, कालीचरण महाराजला आज दुपारपर्यंत रायपूर येथे आणण्यात येणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1476395661650137089?s=२०

काय आहे प्रकरण?

छत्तीसगडमधील रायपूर येथे रविवारी पार पडलेल्या धर्मसंसदेत कालीचरण याने महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गोडवे गायले होते. तसेच महात्मा गांधींविषयी अनेक अपशब्द वापरले होते. त्यानंतर देशभरातून त्याच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कालीचरणवर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. शिवाय विधानसभेतही या संदर्भात मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

कोण आहे कालीचरण ?

कालीचरण महाराजाचं मूळ नाव अभिजीत धनंजय सराग असं आहे.अकोल्यातील जूने शहर भागातील शिवाजीनगर येथील ‘भावसार पंचबंगला’ भागात कालीचरणचे निवासस्थान आहे. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजांची मोठी क्रेझ असून २०१७ मध्ये या कालिचरण महाराजाने अकोला महापालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्याचा पराभव झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महाराष्ट्र बंद करायचं शिवसेनेच्या मनात नव्हतं, पण…’

News Desk

राज्यात २०१९ च्या जूनपर्यंत ३०,००० किमी ग्रामीण मार्गांची पूर्तता | फडणवीस

News Desk

“उगाच काड्या करण्याचं काम कोणीही करू नये!” राऊतांचा धमकीवजा इशारा

News Desk