HW News Marathi
महाराष्ट्र

नाशिक महापालिकेत ४ वेळा निवडून येणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवका कल्पना पांडेंचं कोरोनामुळे निधन 

नाशिक | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य नागरिकांसोबत नेत्यांनाही कोरोना होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही नेते कोरोनातून बचावले पण काही नेत्यांचा मात्र जीव गेला. शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. आज पहाटेच्या सुमारास कल्पना पांडे यांची प्राणज्योत मालवली. कल्पना पांडे या नाशिक प्रभाग क्रमांक २४चे प्रतिनिधित्व करत होत्या.

कल्पना पांडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नाशिकमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांना जबरदस्त धक्का बसला आहे.नाशिक महापालिका निवडणुकीत त्या सलग चार वेळा निवडून आल्या होत्या. कल्पना पांडे यांनी सिडको प्रभाग सभापती म्हणून दोन वेळा काम पाहिले आहे. तसेच नाशिक महापालिकेतील अनेक समित्यांवरही त्यांनी काम केलं आहे. कोरोना काळात कल्पना पांडे /यांनी रुग्णाला रुग्णालय मिळवून देणं, औषधाची सोय करणं, जनजागृती करणं, यासारखी अनेक कामं केली.

दरम्यान, राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील रुग्णालयेही आता अपुरी पडू लागली आहे. कॉंग्रसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचेही कोरोनामुळे अलीकडेच मृत्यू झाला होता. तर भाजपचे पालघर जिल्हा उपध्यक्ष लक्ष्मण वरखंडे यांचाही मृत्यू झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडीचे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला हा संसार आहे – राम शिंदे

News Desk

गोपीचंद पडळकर आज भाजपमध्ये, काँग्रेसच्या ६ आमदारांचा प्रवेश लांबणीवर

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लातूर-सीएसटी एक्सप्रेस ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड

Aprna