कल्याण | कल्याण-डोंबिवलीदेखील कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट तयार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पण अशात कल्याण-डोंबिवलीकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कल्याण-डोंबिवलीत एका दिवसात तब्बल ५१ लोकं कोरोनामुक्त झाले आहेत. या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे.
राज्यासह काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशामध्ये कल्याण-डोंबिवलीकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत एकूण ३९१ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर यापैकी १८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ३९१ कोरोना रुग्णांपैकी एकूण १८१ रुग्ण म्हणजेच ४६% कोरोना रुग्ण यशस्वीपणे उपचार घेऊन बरे झाले आहेत. या सर्व प्रक्रियेत डॉक्टर व त्यांचे सहकारी कर्मचारी आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले. ही बातमी नक्कीच आपल्या सर्वांसाठी कौतुकास्पद आहे. pic.twitter.com/SDPrD97SF7
— Kalyan Dombivli Municipal Corporation (@KDMCOfficial) May 14, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.