HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवलीमध्ये ही लॉक डाऊन १९ जुलैपर्यंत वाढवला!

कल्याण | पुणे आणि ठाण्यापाठोपाठ आता कल्याण आणि डोंबिवलीतही लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. डोंबिवलीत आधी २ ते १२ जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. आता लॉकडाउन आणखी ७ दिवस वाढवण्यात आला आहे. १२ जुलैपासून सकाळी ७ वाजल्यापासून ते १९ जुलै संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत.

२ ते १२ जुलै या कालावाधीत कल्याण डोंबिवलीत लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. सकाळी ७ ते १० या वेळेत दुधाची डेअरी, किराणा सामान आणि मेडिकल सुरु होती. मेडिकलची सुरु राहण्याची वेळ संध्याकाळी ७ पर्यंत करण्यात आली होती.

Related posts

शुल्क विभागाचे धाडसत्र सुरू,१३ दिवसात १,४२९ गुन्ह्यांची नोंद

News Desk

प्रजासत्ताक दिनी ‘शिवभोजन थाळी’ योजनेला सुरुवात

rasika shinde

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ

News Desk