HW News Marathi
महाराष्ट्र

एका महान पित्याचा मुलगा असणे म्हणजे…कंगणाने थेट मुख्यमंत्र्यांना केले टार्गेट

मुंबई | एका महान पित्याचा मुलगा असणे म्हणजे कर्तृत्त्व नव्हे, अशा शब्दांत अभिनेत्री कंगना राणावत हिने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यानंतर शिवसेनेकडून कंगनावर टीकेची झोड उठवली होती. मात्र, कंगना देखील तितक्याच इर्ष्येने या टीकेला प्रत्युत्तर देत आहे. कंगनाने शिवसेना नेते संजय राऊत यांनाही लक्ष्य केले होते.

कंगनाने काल रात्री केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एका महान पित्याचा मुलगा असणे, हे काही कर्तृत्त्व असून शकत नाही. मला महाराष्ट्रप्रेमाचे प्रमाणपण द्यायला तुम्ही कोण लागून गेलात? तुम्ही महाराष्ट्रावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करता, हे कोणी ठरवले? मला मुंबईत येण्याचा हक्क नाही, हे कोणी सांगितले, असे सवाल कंगनाने उपस्थितकेले आहेत. तसेच या ट्विटसोबत कंगनाने #ShameOnMahaGovt असा हॅशटॅगही वापरला आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणखीनच आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

https://twitter.com/KanganaTeam/status/1301880314155864065?s=19

तत्पूर्वी मुंबईसंदर्भात केलेली टीका अंगलट आल्यानंतर कंगनाचा सूर काहीसा मवाळ झाल्याचे दिसून आले. माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईबद्दलचं माझं प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही. मला स्वीकारणाऱ्या मुंबईला मी नेहमीच यशोदा मातेचा दर्जा दिला आहे. जय मुंबई, जय महाराष्ट्र!, असे ट्विट कंगनाने केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो”, निलेश राणेंचा टोला

News Desk

जेव्हा वचन दिलेत तेव्हा पासून ५०० चौ. फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करा!

Aprna

काँग्रेसचे राज्यव्यापी ‘जीवनदान महाअभियान’ रक्तदान शिबिर ! | बाळासाहेब थोरात

News Desk