HW News Marathi
महाराष्ट्र

हे पाहून आनंद झाला की ‘गुंडा सरकार’ला राज्यपाल प्रश्न विचारतायत – कंगना राणावत

मुंबई | राज्यातील लॉकडाऊन शिथिल केला जात असताना आणि एकीकडे बार, रेस्टॉरंट खुली करत असताना देवीदेवतांना मात्र अजूनही कुलूपबंद का ठेवलं जात आहे? असा सवाल राज्यपाल कोश्यारी यांनी केला होता. त्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारेच राज्यपालांना उत्तर दिले होते. कोरोनाचा धोका लक्षात घेता मंदिरं उघडणं अद्याप शक्य होत नसून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन त्यांनी याद्वारे दिलं. या पत्रांमुळे ठाकरे सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यात प्रचंड वाद झाला. या वादात अभिनेत्री कंगना राणावत हिने या वादात उडी घेतली आहे.

“हे पाहून आनंद झाला की ‘गुंडा सरकार’ला राज्यपाल प्रश्न विचारत आहेत. राज्यपाल महोदय, गुंडा सरकारने बार आणि रेस्टॉरंट उघडण्याची परवानगी दिली आहे, पण मंदिरं मात्र योजनाबद्ध पद्धतीने बंद करून ठेवली जात आहेत. ही सोनिया सेना तर बाबरसेनेपेक्षाही वाइट वर्तणुक करताना दिसते आहे”, असे ट्विट अभिनेत्री कंगना राणावतने केले आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1315950315972173825?s=19

 

राज्यपालांनी काय लिहिले होते पत्रात?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंदिरं खुली करण्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १२ ऑक्टोबरला पत्र पाठवलं. यात राज्यपालांनी एकीकडे सरकार बार, रेस्टॉरंट खुले करत आहे, तर देवीदेवतांना मात्र अजूनही लॉकडाउनमध्येच का ठेवलं आहे? असा सवाल केला. मागील तीन महिन्याच्या काळात अनेक शिष्टमंडळांनी या संदर्भात माझी भेट घेतली आहे. तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात. तुम्ही हे सार्वजनिकरित्या मान्यही करता. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही आयोध्येलाही गेला होता. तुम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुख्मिणीचीही पूजा केलीत. अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आली असून महाराष्ट्रातही करोना मार्गदर्शक सूचनांची अमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी, असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंनी काय दिलेले उत्तर?

जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जिवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचं हसत-खेळत स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. प्रार्थनास्थळं उघडण्याबाबतच्या आपल्या विनंतीचा सरकार नक्की विचार करेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाविकांची बस 100 फुटांवरून पंचगंगा नदीत कोसळली 13जणांचा मृत्यू

News Desk

खुप लोकांना वाटलं पंकजा ताई गेल्या, संपल्या!

News Desk

“दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाका अन्यथा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आंदोलन करू”-देवेंद्र फडणवीस

News Desk