HW News Marathi
महाराष्ट्र

कंगना रणावतचे ट्विटर हँडल सस्पेंड, बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर केली कारवाई

मुंबई | अभिनेत्री कंगना रणावत ट्विटरचे हँडल सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली. बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर कारवाई करण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्रींनी ट्वीटच्या करत आक्षेपार्ह भाष्य केले होते.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसी विजयी झाल्यानंतर कंगनाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. अभिनेत्री कंगना रनौतने मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या नियमांविरूद्ध मजकूर पोस्ट केल्यानंतर तिचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे.

अभिनेत्री कंगना रणावत हिच्यापुढं असणाऱ्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीत. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार कंगनानं केलेले ट्विट हे अपनास्पद असून, पश्चिम बंगल आणि तेथील नागरिकांची अवहेलना करणारे असल्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्याचा मुद्दा अधोरेखित करत या तिच्याविरोधात कोलकाता पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कंगनानं ट्विटमध्ये काय म्हटलं होतं?

‘बांगलादेशी आणि रोहिंग्या हेच ममता बॅनर्जी यांची ताकद आहेत. इथं हिंदूंची संख्या जास्त नाही हे स्पष्ट होत आहे. आणि माहितीनुसार बंगाली मुस्लिम हे सर्वात गरीब आहेत. चांगलं आहे, देशात आणखी एक काश्मीर आकारास येत आहे… ‘, असं ट्विट तिनं केलं होतं. तिनं आणखी एका ट्विटच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये भाजपला कशा प्रकारे यश मिळालं आहे, याबाबत ट्विच करत देशातील सत्ताधारी पक्षाची प्रशंसा केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकार मशिदसाठी ट्रस्ट का उभारु शकत नाही?

swarit

पुण्यातील मनसेच्या शिलेदारांना राज ठाकरे कानमंत्र देणार

News Desk

अजित पवार-हसन मुश्रीफ यांना राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सहकार विभागाचीही क्लीन चिट

News Desk