HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

लोकसभा खासदार कपिल पाटील यांनाही कोरोनाची लागण

भिवंडी | राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. एका मागून एक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होत आहे. लोकसभेचे भाजप खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कपिल पाटील यांना सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

खासदार कपिल पाटील यांच्यासह कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी, सून, पुतण्या यांसह एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. खासदार कपिल पाटील यांना सौम्य लक्षणे असल्याने घरातच क्वारंटाईन करण्यात आली आहे.

यापूर्वी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. आणि त्यातून बरे होऊन ते घरी देखील गेले आहेत.

Related posts

मोदी सरकारच्या काळात वंचित-बहुजन समाजावर सर्वाधिक अन्याय | ओवेसी

Gauri Tilekar

अभिनेता अभिषेक बच्चनदेखील कोरोनामुक्त !

News Desk

‘या’ राज्यातून १२०० जणांना झारखंडला नेण्यासाठी पहिली नॉनस्टॉप विशेष ट्रेन रवाना

News Desk