HW News Marathi
महाराष्ट्र

करण जोहरच्या पार्टीची चौकशी फडणवीस सरकार असतानाच का नाही केली !- सचिन सावंत

मुंबई | चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरच्या पार्टीच्या एका व्हीडिओवरून एनसीबीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. हा व्हिडिओ २०१९ साली वायरल झाला, त्यावेळी फडणवीस सरकार होते त्यावेळीच या पार्टीची चौकशी करावी असे फडणवीस सरकारला किंवा एनसीबीला का वाटले नाही. पार्टीच्या व्हिडिओवरून करणला चौकशीस बोलणारी एनसीबी कंगणा राणावतला चौकशीसाठी बोलवण्यास का घाबरते? ड्रग संदर्भात तिचाही एक व्हिडिओ वायरल झालेला आहे. तिच्याबदद्ल एनसीबीला एवढी आपुलकी का व कशासाठी? असे प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारले आहेत.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, राष्ट्रीय तपास यंत्रणा ह्या भारतीय जनता पार्टी सरकारच्या हातच्या बाहुल्या झाल्या आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर त्या नाचत आहेत हे वारंवार स्पष्ट होत आहे. एनसीबी, ईडी, सीबीआय, आयकर विभाग या राष्ट्रीय तपास यंत्रणा सिलेक्टिव्ह चौकशी करताना दिसत आहेत. एका पार्टीच्या व्हिडिओवरून करण जोहरची चौकशी होऊ शकते तर मग कंगणाच्या चौकशीची हिम्मत एनसीबी का दाखवत नाही. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात एनसीबीचा काय स्वार्थ असावा. करण जोहरच्या पार्टीचा व्हिडिओ २०१९ चा आहे त्यावेळी गृहमंत्री फडणवीस होते त्यांनी यावर खुलासा करावा.

एनसीबीला इडीतर्फे सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग अँगल शोधण्यासाठी बोलवण्यात आले होते. ‌अभिनेता सुशांतसिंह प्रकरणातील ड्रग अँगलची चौकशी करण्यात एनसीबी सपशेल फेल गेली आहे. आता ‘जाना था जापान पहुंच गये चीन’ अशी एनसीबीची अवस्था आहे. सीबीआयसुद्धा सुशांतसिंह प्रकरणात काहीच निष्पन्न करु शकली नाही. आज सीबीआय चिडीचूप बसली आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येचा वापर भाजपाने आपल्या गलिच्छ राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन घेतला. आजही तेच होत आहे.

ड्रगच्या चौकशीच्या नावाखाली बॉलिवूडला, महाराष्ट्राला, मुंबई पोलीसांना बदनाम करण्याची पद्धतशीर मोहिम राबविली जात असून उत्तर प्रदेशमध्ये बॉलिवूड घेऊन जाण्याच्या मोहिमेचा हा एक भाग आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी फिल्मसीटी उभी करण्याची घोषणा केल्यानंतर अशा कारवाया करुन बॉलिवूडवर दबाव टाकण्याचे प्रकार होत आहेत, असंही सावंत म्हणाले.एके ठिकाणी मुंबई पोलीसांच्या नार्कोटीक्स गुन्हे शाखेतर्फे किलो किलोने ड्रग्सचे साठे पकडले जात असताना, एनसीबीच्या हाती ग्रॅमभर ड्रगही लागत नाही, हे वास्तव आहे, असे सावंत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन गडकरींच्या ताफ्यातील गाडीला अपघात!

News Desk

भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा, सामनातून टीका

News Desk

भाजप खासदार उदयनराजे भोसले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

News Desk