HW News Marathi
महाराष्ट्र

करुणा शर्मांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी!

बीड | करुणा शर्मा यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आंबाजोगाई कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. दोन्हीकडची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने करुणा शर्मांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर ड्रायव्हरला एक दिवसाची कोठडी सुनावली आहे.

काय होतं प्रकरण?

करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यता आलं आहे.

परळीत आल्यानंतर आपल्या अंगावर जमाव धावून आला होता, अशी तक्रार शर्मा यांनी परळी शहर पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी 70 ते 80 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शहरात प्रवेश केल्यानंतर जमावाने त्यांची गाडी रोखली होती. काही क्षण ही गाडी थांबल्यानंतर त्या परत निघून गेल्या होत्या.

प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात त्यांचं मत सांगितलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यापासून वंचित ठेवण्याचं काही कारण नाही. त्याठिकाणी जे काही घडलं त्यावरून कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे राखली जातेय, हे स्पष्ट होतंय. बंदूक ठेवल्याचा व्हिडीओ, त्यानंतर मिळालेली पिस्टल हा प्रकार गंभीर आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. कुठल्याही दबावाविना याची चौकशी व्हावी, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात लोकशाही मेली की काय?

भाजप नेते निलेश राणे यांनी देखील ट्विट करत त्यांचं मत सांगितलं आहे. “महाराष्ट्रात लोकशाही मेली की काय? पोलिस डिपार्टमेंटचा किती गैरवापर करणार ठाकरे सरकार? महिलेला टोपी लावून, खोटी माहिती देऊन निवडणूक लढवली त्याला वाचवण्यासाठी किती नीचपणा सरकारकडून केला जाणार आहे? पोलिसांचा धाक दाखवून माणुसकीचा गळा दाबला जातोय, १ दिवस सगळ्या विषयांची परतफेड होणार”, अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राठोड यांनी राजीनामा सोपवला हे वृत्त चुकीचे – संजय राऊत

News Desk

पेठ ग्रामपंचायत नूतन इमारतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाला गती मिळेल! – अजित पवार

Aprna

त्यांची निष्ठा तपासा…नाहीतर ते आपल्याविरोधात काम करतील !

News Desk