HW News Marathi
महाराष्ट्र

महागाई आवरती घ्या… महागाईवर काहीतरी बोला… अन्यथा पुढचा काळ कठीण! – जितेंद्र आव्हाड

मुंबई | उपाशीपोटीच क्रांती घडते एवढं लक्षात घ्या त्यामुळे महागाई आवरती घ्या… महागाईवर काहीतरी बोला…अन्यथा पुढचा काळ कठीण आहे, असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. मागच्या मार्चमध्ये महागाईचा दर ७.२ होता आता महागाईचा दर १४ वर पोचला आहे याचा अर्थ महागाई कधी नव्हे एवढी ७० वर्षात शिगेला पोचली आहे. ७० वर्षात कॉंग्रेसने म्हणजे आम्ही काय केले बोलणार्‍यांना आम्ही महागाई जागतिक बाजारात होती तेव्हा रोखून धरली होती. आता जागतिक बाजारात महागाई नाही. पण आपल्या देशात आहे, याची आठवणही जितेंद्र आव्हाड यांनी करुन दिली आहे.

पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे भाव कुठे पोचले आहेत हे एखाद्या गृहिणीला विचारा…गाडी वापरणाऱ्या मध्यमवर्गीयाला विचारा. एकंदरीतच महागाई सर्वसामान्यांना भाजून काढत आहे. उन्हाचा चटका कमी तर महागाईचा चटका जास्त बसतोय मात्र आपण फक्त मीडिया, पेपरमध्ये, राजकीय चर्चेतसुध्दा काय पहातो आहे. तर फक्त नको त्या विषयांना विषय बनवले जात आहे. एकंदरीतच महागाई कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून हे केले जात आहे, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. धर्म ही अफूची गोळी आहे ती खाल्ली की लोकं सगळं विसरतात हे कार्ल मार्क्स यांचे उदाहरणही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार! पण लॉटरी एकदाच लागते, अशोक चव्हाणांचा हल्लाबोल!

News Desk

मिसेस फडणवीस यांनी महिला बचत गटासाठी घेतली पालिका आयुक्तांची भेट

News Desk

“राम्या पोरी पळव…पंकु चिक्की घे…”, राष्ट्रवादीची जोरदार टीका

News Desk