HW News Marathi
Covid-19

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीतील ‘हे’ महत्वाचे मुद्दे

मुंबई | राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यांचे दौरे सुरू केले असून त्यांनी काल (२० मे) नाशिक आणि ठाणे येथे बैठक घेऊन खरिपाचा आढावा घेतला. दरम्यान, आज (२१ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक सुरू आहेत.

लॉकडाऊन नंतर दररोज २ हजार टन भाजीपाला आणि फळे यांची ३२०० पेक्षा जास्त ठिकाणी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री पोहोचविले जाते. ३७९० गटांमार्फत ९ लाख ६८ हजार ५५० क्विंटल फळे व भाजीपाला ऑनलाईन व थेट विक्री.यासाठी राज्यात ३२१२ थेट विक्री केंद्रे स्थापन केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषिमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे,कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, अदिती तटकरे, उपस्थित आहेत.

 

खरीप हंगाम बैठक : मुद्दे

  • २०२० चा नैऋत्य मौसमी पाउस सरासरी ९६ % ते १०४ % टक्के राहील असा अंदाज
  • अल-निनो सामान्य राहणार. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सौम्य स्वरूपात एल निनो स्थिती
  • केरळला आगमन ५ जून. मान्सूनचे अंदमानमध्ये आगमन
  • मौसमी पाउस राज्यात काहीसा उशिरा येईल . मुंबईत ११ जूनपासून. पण १८ जूनपर्यंत सर्व राज्यात पसरेल.
  • विविध पिकांखाली एकूण खरीप क्षेत्र १४०.११ लाख हे,
  • सोयाबीन व कापूस ८२ लाख हेक्टर
  • बियाणांची गरज १६.१५ लाख क्विंटल
  • बियाणांची उपलब्ध १७.०१ लाख क्विंटल
  • सोयाबीन व कापूस या पिकांखाली खरीपाचे ६० टक्के क्षेत्र
  • मागच्या वर्षी तुरीत चांगली वाढ झाली. सोयाबीन आणि कापसातही मागच्या वर्षी चांगली वाढ

लॉकडाऊन

  • लॉकडाऊन नंतर दररोज २ हजार टन भाजीपाला आणि फळे यांची ३२०० पेक्षा जास्त ठिकाणी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री. ३७९० गटांमार्फत ९ लाख ६८ हजार ५५० क्विंटल फळे व भाजीपाला ऑनलाईन व थेट विक्री.यासाठी राज्यात ३२१२ थेट विक्री केंद्रे स्थापन.
  • हापूस आंब्याच्या विक्रीसाठी कृषी व पणन विभागामार्फत प्रयत्न
  • कृषी माल निर्यातीसाठी आवश्यक फायटोसेनिटरी प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत.
  • शेतमाल आणि कृषी निविष्ठा विक्रीसाठी आणि वाहतुकीसाठी परिवहन आणि गृह विभागाचे परवाने
  • बहुतेक कृषी उत्पन्न बाजार समित्यातून शेतमालाची विक्री
  • शेतकऱ्यांच्या ऑनलाईन मार्गदर्शन व प्रशिक्षण
  • जिल्ह्यातील सर्व बियाणे प्रक्रिया केंद्रे सुरु
  • बियाणे उत्पादक कंपन्यांशी सातत्याने व्हिसीद्वारे संपर्क
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे जिल्हा आणि राज्य स्तरावर नियंत्रण कक्ष
  • शेतकऱ्यांना बांधावरच बी बियाणे मिळावेत म्हणून ३ हजार शेतकरी गटांच्या मदतीने नियोजन. ५४ हजार मेट्रिक टन बियाणे पोहोचविणे सुरु . गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न.
  • महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : एकूण ६० टक्के अंमलबजावणी
  • ३२ लाख खातेदारांना लाभ देणे अपेक्षित
  • मार्च २०२० अखेरीस १९ लाख कर्ज खात्यांमध्ये १२ हजार कोटी भरले
  • निधी अभावी ११.१२ लाख खातेदारांना ८१०० कोटी लाभ देणे बाकी आहे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत १२,८८१ नवे रूग्ण आढळले

News Desk

पशुधन, मत्स्यपालन यांसाठी ‘या’ पॅकेजमधून विशेष साहाय्य

News Desk

“कोरोना लसीच्या दोन डोसमधलं अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती”, भारतीय वैज्ञानिकांचा गंभीर दावा!

News Desk