HW News Marathi
महाराष्ट्र

‘एखादा शूटर लावून मला मारून टाका’ जळगावात सेनेच्या आमदाराची थेट खडसेंकडे मागणी

मुक्ताईनगर। नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात वाद नुकताच मिटला आहे. पण, आता जळगावमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये वाद उफाळून आला आहे ‘एखादा शूटर लावून मला मारून टाका’ अशी मागणीच पाटील यांनी केली आहे.राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज बोदवड येथे एका व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत माहिती देत मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला.

भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंना कधी लपावं लागतं तर कधी पळावं लागतं

‘खडसे हे आजही मी युती तोडण्याबद्दल अहंकाराने सांगतात, सध्या एकनाथ खडसे यांचा डोकं ठिकाणावर नसून पक्ष बदलल्यानंतर देखील त्यांना अजूनपर्यंत काही मिळाले नाही. त्यातच भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंना कधी लपावं लागतं तर कधी पळावं लागतं अशी परिस्थिती असताना तीन तीन वेळा कोविड त्यांना होतो. त्यामुळे त्यांच्याविषयी मला सहानुभूती असल्याची मिश्कील टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.’एकनाथ खडसे यांनी माझ्या संदर्भात लेव्हल सोडून बोलू नये एकनाथ खडसे यांनी लेव्हल सोडल्यास मी देखील लेव्हल सोडून बोलेल. मी खडसे यांचा कधीही अनादर केला नसून बोलताना मात्र एकनाथ खडसे आणि तोंडाला कुलूप लावावे’ असंही पाटील म्हणाले.

एखादा शूटर लावून मला मारुन टाकावे

‘व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत एकनाथ खडसे हे माझे नाव जोडत असून खडसेंनी ही क्लिप मतदारसंघातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचावी. जेणेकरून कोणाची काय पात्रता आहे हे मतदारांना कळेल. मी व माझे कुटुंब अत्यंत साधेपणाने जगतोय. त्यामुळे खडसेंना असं वाटत असेल तर त्यांनी एखादा शूटर लावून मला मारुन टाकावे, माझी छोटे कुटुंब असून माझा बाजूने कोणी बोलणारेही नाही , आजही मी रात्री 10 वाजता घराला कुलूप लावून राहतो ही स्थिती आहे’ असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षपूर्ती मुलाखत लवकरच प्रदर्शित होणार…

News Desk

प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण अर्थसंकल्पीय तरतुदीतून करता येणे शक्य असताना सर्वसामान्यांकडून शुल्क का घेत आहे?  

News Desk

“मोदी मंदिरात दर्शनाला जो येईल त्याला लगेच…”प्रशांत जगतापांची मोदींवर खोचक शब्दात टीका!

News Desk