मुंबई। मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणीतील साक्षीदार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावी गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. अखेर आज पुणे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि किरण गोसावीविरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत. मात्र किरण गोसावीविरोधात यापूर्वीपासून अनेक गुन्हे दाखल होते. अशातच चिन्मय देशमुख तरुणाने नोकरीच्या आमिष दाखवून किरण गोसावीने आपली फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अखेर किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याचपार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेत आरोपी किरण गोसावी संदर्भात माहिती दिली आहे.
पहाटेच्या सुमारास किरण गोसावीला अटक
२०१८ च्या एका गुन्ह्यात किरण गोसावीविरोधात गुन्हा दाखल केला होता. या आरोपीविरोधात ४२० आयटी अॅटनुसार फसवणूकीचे गुन्हे दाखल होते. यात एका व्यक्तीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून मलेशियाला पाठवत त्याची किरण गोसावीने फसवणूक केली होती. मार्च २०१९ मध्ये गोसावीविरोधात आरोप पत्र दाखल करण्यात आले. मात्र तेव्हापासून तो फरार होता. अलीकडच्या काळात त्याचे फोटोग्राफ सोशल मीडियावर पाहायला मिळाले. तेव्हापासून पुणे पोलिसांचे अनेक पथकं त्याचा मागावर होती. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास किरण गोसावीला अटक करण्यात यश आले आहे. त्य़ाची अटक प्रक्रिय़ा पूर्ण करतोय. गोसावीच्या अटकेनंतर आता चारशीटचा राहालेला भाग पूर्ण करणार आहोत. यापुढेही त्याविरोधात काय गुन्हे आलेच तर त्यावर आपण तक्रार दाखल करणार आहोत. असं पुणे पोलीस आयुक्त म्हणाले.
सचिन पाटील या नावाने लपत होता
कात्रज येथील एका लॉजमधून किरण गोसावीला अटक करण्यात आली आहे. त्याने आत्मसमर्पण केलेले नाही त्याला पुणे पोलिसांनी सकाळी तीन वाजता अटक केली आहे, आता कोर्टाच्या आदेशानंतर पुढील तपास केला जाईल अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.गेल्या १० दिवसांपासून पुणे पोलीस त्यांच्या मागावर होते. गेल्या दहा दिवसात किरण गोसावीचे लखनऊ, जबलपूर, तेलंगणा, हैदराबाद, फतेहपूर, जळगाव, मुंबई, पनवेल, लोणावळा भागात लोकेशन दिसले. यात केपी गोसावी सचिन पाटील या नावाने लपत होता. हॉटेलमध्ये राहत होता. लखनऊमध्ये किरण गोसावी सचिन पाटील नावाने हॉटेलमध्ये राहत होता. तसेच तो स्टॉप क्राईम ऑर्गनायजेशन एनजीओचा सदस्य तसेच शिप्का नावाच्या डेटेक्टिव्ह एन्जसीचा मेंबर असल्याचे सांगायचा. याशिवाय एक्सपोर्ट- इनपोर्टमध्ये त्याचा व्यवसाय आहे. यात मेटल, इलेक्ट्रोनिक्सच्या एक्सपोर्ट – इमपोर्टचं काम करतो असं सागांयचा. नोकरीचे आमिष दाखवून फसवल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अशी माहितीही पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.