HW News Marathi
महाराष्ट्र

किरीट सोमय्यांचा अर्जुन खोतकर यांच्यावर पुन्हा हल्लाबोल!

मुंबई। शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीकडून नुकतीच (26 नोव्हेंबर) छापेमारी करण्यात आली. आणि अस आता असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ माजवून दिली आहे. अर्जुन खोतकर यांनी मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्श आणि इमारतीसाठी 100 एकर जागा हडपण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला आहे.किरीट सोमय्या यांनी आता आपला मोर्चा हा अर्जुन खोतकर यांच्या कडे वळवला आहे. सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने याच कारखान्याशी संबंधित 100 एकर शासकीय जागा हडपण्याचा घोटाळा सुरू आहे. खोतकरांना मॉल तयार करायचा आहे. कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि बिल्डिंगसाठी ही जागा हवी आहे, असा घणाघात आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

नांगरे पाटील यांची पत्नी रुपालीताई यांचं नावही पुढे

साखर कारखान्यासाठी सरकारकडून जागा दिली होती. त्या जागेची किंमत 400 कोटी आहे. सर्व मिळून 240 एकर जागा आहे. त्याची किंमत 1 हजार कोटी आहे. आता ईडीने व्यवस्थित तपास सुरू केला आहे. आयकर विभागालाही त्याची तक्रार केली आहे. आयकर विभागही बेनामी व्यवहाराचा तपास करणार आहे. म्हणूनच आता तपाडीया परिवार आणि सहआयुक्त नांगरे पाटील यांची पत्नी रुपालीताई यांचं नावही पुढे येत आहे. मुंबईच्या सहआयुक्तांना मी भेटलो होतो. या घोटाळ्याचा तपास मी सहआयुक्त होण्यापूर्वी बंद केला होता. कोर्टाला सीसमरी दिली होती. काहीच घोटाळा नाही, असं या सहआयुक्ताने सांगितलं. एका सहआयुक्तांनी दुसऱ्या सहआयुक्ताला सर्टिफिकेट दिलं, असं किरीट सोमय्या यांच्या कडून आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आल आहे.

100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप

शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील राहत्या घरी सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने (26 नोव्हेंबर) सकाळी छापा टाकला आहे. आणि यासोबतच अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने तब्बल 18 तास ही चौकशी केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबादसह जालना आणि नांदेडमधील काही ठिकाणी छापे मारले होते. त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जालना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर ईडीने अर्जुन खोतकरांच्या घरावर हा छापा टाकला आहे.

छापेमारी सत्र सुरूच

राज्यातील सत्ताधारी पक्षातील लोकांच्या आणि नेत्यांच्या घरी आणि साखर कारखान्यांवर ईडीकडून छापेमारी करण्यात येत आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकांवर केंद्रीय संस्थांकडून छापेमारी करण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची तसेच त्यांच्या पत्नीची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या मुलाचीही ईडीकडून चौकशी होणार आहे. राज्यात औरंगाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत ईडीकडून छापेमारी सुरुच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Aprna

शहांचा नोव्हेंबरमध्ये मुंबई दौरा, शिवसेना-भाजप युतीच्या फॉर्म्युल्यावर होणार शिक्कामोर्तब ?

News Desk

आम्ही बहिण-भाऊ आहेत, आमच्या नात्यात पक्ष आणि राजकारण येऊच शकत नाही –  पंकजा मुंडे

News Desk