मुंबई | देशासह महाराष्ट्रात सध्या कोरोनाची स्थिती गंभीर आहे. राज्यातही मुंबईला कोरोनाची अधिक झळ बसली आहे. एकीकडे तासागणिक वाढत जाणारा मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा आणि दुसरीकडे रुग्णांसाठी बेड्सची अपुरी संख्या यामुळे मुंबईपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, मुंबईतील याच आरोग्यविषयक समस्यांकडे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना एक पत्र लिहिले आहे. आपल्या या पत्रातून सोमय्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “वाह रे ठाकरे सरकार”, असे म्हणत किरीट सोमय्यांनी बोचऱ्या शब्दात राज्यातील सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विटकरून किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
'Vah re Thackeray Sarkar' Only 387 Beds are Occupied/Used out of 3000 Beds of NESCO Hospital Goregaon & 315 Beds used out of 1087 of MMRDA BKC Hospital Bandra. At other hospitals patients r kept in lobbies, waiting than Why such situation at BKC NESCO Hospitals??? @Dev_Fadnavis pic.twitter.com/CRiycxVWD1
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 13, 2020
“एकीकडे राज्यातील कोरोनारुग्ण कठीण स्थितीचा सामना करत असताना, आरोग्य सुविधांसाठी झगडत असताना गोरेगाव येथील नेस्को संकुलातील ३,००० बेड्सच्या कोविड सेंटरमधल्या फक्त ३८७ बेडवर रुग्ण आहेत. तर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे एमएमआरडीए मैदानावर उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात एकूण १०८७ बेड्सपैकी केवळ ३१५ बेड्सवरच रुग्ण आहेत. मुंबईत आयसीयू बेड्सची तातडीची गरज आहे. मात्र, अशी स्थिती का निर्माण होत आहे ? मुंबई अशी कुठलीही सुविधा का उपलब्ध नाही, याबाबत महाराष्ट्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी आरोग्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
किरीट सोमय्या यासंदर्भात केलेल्या आपल्या या ट्विटमध्ये पुढे म्हणतात कि, “वाह रे ठाकरे सरकार ! मुंबईतील केईएम, शताब्दी, सायन हॉस्पिटल या रुग्णांलयांमध्ये अनेक रुग्णांना चक्क लॉबीमध्ये ठेवण्यात आले आहे. तर एका बेडवर दोन-दोन रुग्ण उपचार घेत आहेत. दुसरीकडे मात्र बेस्ट रिकामी आहेत. हा प्रकार आपण ठाकरे सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.