HW News Marathi
महाराष्ट्र

“किती वर्ष महाराष्ट्रातल्या लोकांची फसवाफसवी?” – सोमय्या

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांच्या सुमारे एक हजार कोटींपेक्षा अधिक किमतीच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने टांच आणली, हे सध्याच आपण पाहिलंय. त्यावर बातमीवर बोलताना अजित पवार यांच्या वडिलांनी हि गोष्ट अमान्य केली आहे. अशा प्रकारची नोटीस आम्हाला आलीच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पुढील ९० दिवसांमध्ये ती मालमत्ता आपल्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतातून खरेदी केल्याचे त्यांना सिद्ध करावे लागेल. मात्र राष्ट्रवादीने याचा अजित पवारांशी काही संबंध नसल्याचा दावा केलाय. याच दाव्यावरुन आता भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवारांवर आणि पवार कुटुंबावर निशाणा साधलाय.

“अहो, पवार साहेब आपले मित्र, आपले पुत्र, आपली पत्नी, आपली ताई, आपली आई, आपली माई, आपला मामा या सगळ्यांच्या कंपन्यांमध्ये पैसे दिले”

एकीकडे “काँग्रेसने मला सिव्हिल आणि क्रिमिनल डिफमेशनच्या नोटीस दिल्या आहेत. स्वागत करतो. रविंद्र वायकर, अनिल परब, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाडांचे सहय्योगी संजय राऊत अशा अनेकांनी नोटीशी दिल्या केसेस दाखल केल्या. आम्ही त्यांना घाबरणार नाही. महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करणार,” असं सोमय्या म्हणाले आहेत. पुढे “पवार सरकार किती वर्ष महाराष्ट्राच्या लोकांची फसवाफसवी, लपवालपवी करणार? अजित पवार म्हणतात मला नोटीस आली नाही. अहो, पवार साहेब आपले मित्र, आपले पुत्र, आपली पत्नी, आपली ताई, आपली आई, आपली माई, आपला मामा या सगळ्यांच्या कंपन्यांमध्ये पैसे दिले. आता त्यांना प्रॉपर्टी अटॅच व्हायला लागल्या म्हणून डायव्हर्जन करण्याचा प्रयत्न करतायत. अजित पवार आणि मित्र परिवाराच्या प्रॉपर्टी इनकम टॅक्सने जप्त केल्यात. ईडीचा पण तपास सुरु झाला आहे,” असंदेखील सोमय्या म्हणाले आहेत.

‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर प्राप्तिकर विभागाने टांच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे’’, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील अ‍ॅड. प्रशांत पाटील यांनी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुढीपाडवा निमित्ताने धनंजय मुंडेनी घेतले प्रभु वैद्यनाथाची दर्शन

Aprna

कर्जमाफी प्रकियेतील आधार कार्डचा घोळ

News Desk

होम क्वॉरंटाईनमध्ये राहायला सांगितलेल्या व्यक्तींना पोलिस ट्रॅक करणार

swarit