मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी बलात्काराचा आरोप फेटाळला असून तक्रार केलेल्या महिलेच्या मोठ्या बहिणीशी सहमतीने संबंध असल्याचे कबूल केले. त्यांच्या या खुलाशानंतर आणखीच चर्चा सुरु झाल्या. मुंडे यांच्यावर या आरोपानंतर आता भाजपकडून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनीसुद्धा या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ”मुख्यमंत्र्यांवर बंगलो लपवण्याचा आरोप करण्यात आलाय, तर दुसरीकडे त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप केला जातोय. ठाकरे सरकारची किती दयनीय अवस्था आहे. महाराष्ट्राची संस्कृती काय, इथली अस्मिता काय, या सगळ्यावर पाणी फिरवण्याचं काम ठाकरे सरकार करीत आहे”, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
Having Relationship with 3 Women, Minister Dhananjay Munde must stay out from Maharashtra Cabinet till He gets Clean
3 महिलांशी संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी सद्य परिस्थिति स्पष्ट, होईपर्यंत महाराष्ट्र मंत्रिमंडळातून बाहेर रहावे @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/rsKS5H0kfU
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 12, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.