HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचे मुखियाही असेच उद्योग-धंदे करतात हे सर्वांना माहीत आहे, किरिट सोमय्यांचा सरनाईकांवर हल्लाबोल

मुंबई | शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहे. ईडीच्या या कारवाईचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी समर्थन केले आहे. सरनाईक यांनी बेनामी मालमत्ता जमवली असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ईडी सबळ पुरावे आणि माहिती असल्याशिवाय कारवाई करत नाही, असं सांगतानाच शिवसेनेचे मुखियाही असेच उद्योग-धंदे करतात हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दांत किरीट सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सरनाईक यांच्या घरावर ईडीने केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. सरनाईक यांनी जर बेनामी मालमत्ता जमवली असेल. मनी लॉन्ड्रिंग केली असेल किंवा चुकीच्या मार्गाने मालमत्ता जमवली असेल तर कारवाई झालीच पाहिजे. मीही सरनाईक यांच्या बाबतीत अशा गोष्टी ऐकल्या होत्या, असं सोमय्या म्हणाले. मी आमदार आहे म्हणून माझ्यावर कारवाई करू नका, असं म्हणणं योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.

शिवसेनेचे काही नेते मग ते मुंबईतील असो की इतर ठिकाणचे महापालिकेच्या कंत्राटदारांकडून हप्ते घेतात, अशा लोकांवर कारवाई करायला नको का?, असा सवालही त्यांनी केला. यावेळी सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही थेट हल्ला केला. शिवसेनेचे मुखियाही अशाच प्रकारचे उद्योग-धंदे करतात, हे सर्वांनाच माहीत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

आज (२४ नोव्हेंबर) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्याच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. मुंबईत आणखी १० ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. प्रताप सरनाईक यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आवाज उठवला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेस्टोरंट, मंदिरे पुन्हा सुरु करण्याबाबत चर्चा, मात्र लोकल रुळावर येण्यास वाट पाहावी लागणार

News Desk

आम्ही आमची लायकी सिद्ध करु, पक्षाला दखल घेण्यास भाग पाडू !

News Desk

पक्षात अन्याय, अत्याचार होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल !

News Desk