HW News Marathi
महाराष्ट्र

किरीट सोमय्यावर फौजदारी अब्रुनुकसानीचा १०० कोटींचा दावा ठोकणार – हसन मुश्रीफ

कोल्हापूर। किरीट सोमय्यायांनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लागलीच पत्रकार परिषद बोलावली. हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केला असून, त्याबाबत 2700 पानांचा पुरावा इन्कम टॅक्सला दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी थोड्याच वेळापूर्वी केला. सोमय्यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारमधील आणखी एका बड्या मंत्र्यावरच घोटाळ्याचे आरोप केले आहेत.

अब्रुनुकसानीचा १०० कोटींचा दावा ठोकणार

किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर सोमय्या यांना उत्तर देण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीची पत्रकार परिषद घेत उत्तर दिल आहे. किरीट सोमय्या यांच्यावर फौजदारी अब्रूनुकसानीचा शंभर कोटींचा दावा ठोकणार असल्याचे देखील मुश्रीफ यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केल आहे. किरीट सोमय्यांना काही माहिती नसावी. आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील, समरजीत घाटगे यांनी माहिती दिली असेल. आणि यामागे चंद्रकांत पाटील आणि समर्जीत घाटगेच असतील, असा आरोप देखील यावेळी मुश्रीफ यांनी केला आहे. सोमय्यांनी कोल्हापुरात येऊन खातरजमा करायला हवी होती.

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत घेतल्यानंतर लगेचच तातडीची पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिल आहे. किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्र दिली आहेत. आपण नवं काय करतोय असा राणाभीमदेवी थाटात आरोप सोमय्यांनी केला. माझ्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली त्यात काहीच मिळालं नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काही कारवाई नाही. आता किरीट सोमय्या उठून आरोप करत आहेत.

सोमय्या यांनी काय आरोप केले?

ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनची नावं मी जाहीर केली होती. दुर्दैवाने राखीव नावं आहेत. प्रताप सरनाईक, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड, यशवंत जाधव, यामिनी जाधव, अनिल परब, अनिल देशमुख, यांची नावं होती. आता यामध्ये राखीव खेळाडूंचाही समावेश झाला आहे.राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियाने शेकडो कोटीचे घोटाळे केले आहेत. फक्त तेव्हढचं नव्हे तर बोगस कंपन्याद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लाँडरिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं याचे 2700 पेजेसचे पुरावे आहेत, ते मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिले आहेत.

2018- 19 मध्ये इन्कम टॅक्सने मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या

बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे.नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवल आहे त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, 2 कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे.हसन मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख रुपयांचे शेअर्स दाखवले आहे. 2018- 19 मध्ये इन्कम टॅक्सने मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. बेनामी ट्राझॅक्शन 127 कोटींचे व्यवहार समोर आले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मात्र आज पवारांनी त्याच्या पुढचा पर्याय नितिन गडकरींना सांगितला!

News Desk

“नियम पाळणं अहंकार आहे का?”, राज्यपालांच्या मुद्यावरुन राऊतांचा फडणवीसांवर पलटवार 

News Desk

कोविड सेंटरमधील डान्सवरुन प्रविण दरेकरांच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर

News Desk