मुंबई | शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड अखेर लोकांसमोर आले आहेत. पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येत संजय राठोड यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने संजय राठोड यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, संजय राठोड पोहरादेवी मंदिरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांच्या गर्दीचा लोट मंदिराच्या परिसरात दाखल झाला आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनो रुग्ण संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ दिवसांपूर्वीच लोकांना गर्दी टाळण्याचे, सार्वजनिक कार्यक्रम करण्यास मनाई केली होती. मात्र, आज संजय राठोड यांच्या स्वागतासाठी शेकडोच्या संख्येत लोकांनी गर्दी केली आहे. कोरोनाच्या कोणत्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे. यावरुन भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्याच्या मी जबाबदार या मोहिमेवर टीका केली आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मी बेजबाबदार आहे ही मोहिम पाहा. २२ वर्षाच्या मुलीच्या जिवनाशी खेळ करणारे मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई नाही! पण ठाकरे सरकार तर्फे स्वागत पहा, गर्दी पहा…कोरोना की ऐसी की तैसी धन्य हो “ठाकरे सरकार”, असे ट्विट करत सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची
“मी बेजवाबदार आहे!” मोहिम !
22 वर्षाच्या मुलीच्या जिवनाशी खेळ करणारे मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई नाही!
पण ठाकरे सरकार तर्फे
स्वागत पहा, गर्दी पहा…
कोरोना की ऐसी की तैसी
धन्य हो "ठाकरे सरकार" @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/6Xhh7Y0LkC
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 23, 2021