मुंबई | मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेले सचिन वाझे यांच्यानंतर प्रदीप शर्मादेखील तुरुंगात जाणार असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज (१७ जून) (एनआयए) छापा टाकला असून कारवाई सुरु आहे. किरीट सोमय्या यांनी यावरुन शिवसेनेवर जोरदार टीका करताना उद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे एकामागोमाग एक जेलमध्ये जाणार असल्याचं म्हटलं आहे.
उद्योगपती अंबानी धमकी प्रकरण तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएकडून तपास सुरु असून त्याच पार्श्वभूमीवर छापा टाकण्यात आला आहे. सकाळी सहा वाजल्यापासून कारवाई सुरु असून प्रदीप शर्मांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यादरम्यान प्रदीप शर्मा यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.
किरीट सोमय्या यांनी कारवाईवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “आधी शिवसेनेचे प्रवक्ते सचिन वाझे आतमध्ये गेले आणि आता शिवसेनेचे उपनेते प्रदीप शर्मा जेलमध्ये जाणार आहेत”. पुढे ते म्हणाले की, “मनसुख प्रकरणात त्यांच्यावर कारवाई होत असली तरी सचिन वाझे यांनी अनिल परब- प्रदीप शर्मा यांच्याबाबत वसुलीसंबंधी जी माहिती दिली आहे त्यानंतर अनिल परब यांच्या घरीही तपास यंत्रणा पोहोचणार असून त्यावेळी मला आश्चर्य वाटणार नाही”.
#MansukhHiren Murder #NIA at Residence of #PradipSharma Leader & Candidate of #ShivSena
#SachinVaze Shivsena Spoke Person is in Jail
#Prado Car used for Mansukh Murder was supplied by Shivsena Minister #AnilParab 's Partner's PartnerIt's Shivsena Mafia Sena @BJP4India pic.twitter.com/gfxUkiadqU
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 17, 2021
“उद्धव ठाकरेंची जी गुंडसेना आहे त्यातील सगळे एकामागोमाग एक जेलमध्ये जाणार आहेत,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे. “अनिल परब यांचा दापोली रिसॉर्ट घोटाळा जो काढला आहे त्यात सदानंद कदम त्यांचा पार्टनर आहे. सदानंद कदम याचा पार्टनर शिवसेनेचा शाखाप्रमुख असून त्यानेच मनसुखला मारण्यासाठी सचिन वाझेला वाहन दिलं होतं. त्यामुळे तुम्ही हे सर्व धागेदोरे पहा कसे आहेत. ही सगळी उद्धव ठाकरेंची माफिया सेना आहे,” असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
Mumbai: NIA conducts raid at the residence of Shiv Sena leader and former 'encounter specialist' of Mumbai Police, Pradeep Sharma. Details awaited.#Maharashtra pic.twitter.com/s6dO1WMh6T
— ANI (@ANI) June 17, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.