HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील कीर्तनकारांना महिन्याला 5 हजार मिळणार! ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई | राज्यात कोरोनामुळे अनेकांच्या रोजगारावर प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील कीर्तनकारांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. राज्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, यांना 5 हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे.

कीर्तनकारांसाठी खुशखबर

कोरोनाकाळात कीर्तने, प्रवचने बंद असल्याने छोट्या मोठ्या कीर्तनकार, प्रवचनकार यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली तर काही जणांना उपासमारीला देखील सामोरं जावं लागलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम बंद आहेत. त्यात कीर्तनकार-प्रवचनकार दुसरं कोणतं कामंही करु शकत नाही. त्यामुळे त्यांना शासनाकडून मदतीची गरज होती. अखेर ठाकरे सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील कीर्तनकारांना कोरोना काळात ‘अच्छे दिन’ दाखवले आहेत.

कीर्तनकार-गायक-वादकांना प्रत्येकी 5 हजार रुपये

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार , प्रवचनकार , गायक, वादक, यांना प्रत्येकी 5 हजार रुपये मानधन म्हणून मिळणार आहे. यासंदर्भात काल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि महसूल मंत्री बाळासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत हा स्त्युत्य निर्णय घेण्यात आला आहे.

तिसऱ्या लाटेची भीती

राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये अनेक कुटुंब उध्वस्त झाली. हजारो जणांचे जीव गेले. शासन प्रशासन कोरोनाला अटकाव घालण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहे. मात्र लोकांनीही शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळणे आवश्यक बनले आहेत. श्रावण महिना सरलाय. आता सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, दसरा, ख्रिसमस सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. अशा काळात गर्दी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होण्याची दाट शक्यता असते. पण अशी गर्दी होऊ नये म्हणून शासन आता निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. तसंच राज्यभरातील मंदिरे, देवस्थाने देखील पुढचे अनेक दिवस बंदच राहणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देत आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जायची भाषा करत असाल तर…!

News Desk

महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी – चंद्रकांत पाटील

News Desk

गोपीनाथ गडावर पंकजांचा पराभव

News Desk