Lमुंबई | अभिनेत्री कंगना राणावतच्या मुंबईतील कार्यालयावरील महापालिकेने केलेल्या कारवाईवर मुंबई हायकोर्टाने ताशेरे ओढले आहेत. पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेने केलेली कारवाई नियमानुसारच केली असल्याचं ठाम मत व्यक्त केलं आहे. मुंबई हायकोर्टाने आज दिलेल्या निकालानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या कायदेशीर बाजू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. कंगनाच्या याचिकेवर हायकोर्टाने दिलेल्या निकालानंतर पुढील रुपरेषा या बैठकीत ठरविण्यात येणार असल्याचं कळतं.
Mumbai Mayor Kishori Pednekar to hold meeting with Brihanmumbai Municipal Corporation (BMC) legal team to assess Bombay High Court's order in Kangana Ranaut case
"What we did was according to municipal rules. I haven't seen court order, will go through it," she says (File pic) https://t.co/Dkh3TOfyGp pic.twitter.com/GeIv3JoYTH
— ANI (@ANI) November 27, 2020
मुंबई महापालिकेने केलेली कारवाई महापालिकेच्या नियमानुसारच केली आहे. मी अद्याप कोर्टाने दिलेला निकाल वाचलेला नाही. तो वाचल्यानंतरच अधिक स्पष्टता येईल”, असं पेडणेकर म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता पुढे हे प्रकरण काय वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई अवैध असल्याचा निकाल आज मुंबई हायकोर्टाने दिला. यासोबत नुकसान भरपाईचे आदेशही दिले आहेत. यासाठी झालेल्या नुकसानाचे मुल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण अधिकारी नेमण्यास कोर्टानं सांगितलं आहे व त्याचा अहवाल मार्च २०२१ पूर्वी सादर करावा लागणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.