HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर होणार मुंबईच्या नव्या महापौर

मुंबई | मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. तर उपमहापौरपदासाठी सुहास वाडकर यांची निवड करण्यात आली आहे. पेडणेकर यांनी आज महापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. मुंबई महापालिका महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे.

मुंबईच्या महापौरपदासाठी यशवंत जाधव, मंगेश सातमकर, आशिष चेंबुरकर, विशाखा राऊत, शेखर वायंगणकर यांनी महापौरपदासाठी दावा केला होता. मात्र किशोरी पेडणेकर आणि यशवंत जाधव यांची नावे आघाडीवर होती. मात्र, शेवटच्या क्षणी किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

येत्या २२ नोव्हेंबर रोजी मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक होणार आहे. दुसरीकडे शिवसेना-भाजप युती तुटल्याने, भाजपकडून महापौरपदासाठी उमेदवार देण्याची चर्चा होती. मात्र भाजपने मुंबई महापौरपदाची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली आहे.

 

Related posts

मोदी आणि शहा बेळगावमध्ये सुरू असलेल्या खुनी हल्ल्यांवर गप्प का?, राऊतांचा सवाल

News Desk

एका महान पित्याचा मुलगा असणे म्हणजे…कंगणाने थेट मुख्यमंत्र्यांना केले टार्गेट

News Desk

‘शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, एकच आवाज येईल, काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत आघाडी नको’ -भाजपा

News Desk