HW News Marathi
महाराष्ट्र

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला, सुदैवाने दुखापत नाही

उस्मानाबाद | विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी ऐन रंगात आली असताना उस्मानाबादमध्ये मोठी घटना घडली आहे. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका अज्ञात तरुणाने चाकू हल्ला झाल्याची घटन घडली आहे. मात्र, या चाकूहल्ल्यात सुदैवाने निंबाळकर दुखापत नाही बचावले. कळंब  तालुक्यातील नायगाव पाडोळी गावातील ही घटना घडली आहे. या गावातील प्रचार सभेत तरुणाकडून चाकू हल्ला करण्यात आला.

उस्मानाबाद कळंब तालुक्यातील शिवसेनेचे कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ निंबाळकर हे नायगाव पाडोळी गावात गेले होते. त्यावेळी निंबाळकर यांच्यावर अजिंक्य टेकाळे यांच्यावर या युवकांने चाकूहल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. टेकाळे हे भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती त्यांच्या फेसबुक प्रोफाईवरून कळत आहे.  टेकाळे यांनी निंबाळकर यांच्या प्रचारादरम्यान त्यांच्या हात मिळविण्यासाठी त्यांच्यासमोर आला. टेकाळे यांनी एक हात निंबाळकर यांना हात मिळविण्या करण्यासाठी पुढे केला आणि दुसऱ्या हाताने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. या घटनेत निंबाळकर यांना गंभीर दुखापत झाली नाही. या हल्ल्याचा तपास उस्मानाबाद पोलीस करत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरोग्य विभागाने नव्याने ८ तर वैद्यकीय शिक्षण विभागाने १७ रुग्णालये अधिसूचित केली

News Desk

“नवनीत राणा ‘सी’ ग्रेड फिल्म करणाऱ्या, एक आमदार भाळला आणि…”; शिवसेनेने फटकारले

Manasi Devkar

मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी मुख्यमंत्र्यांची शिवसेनेला नवी ऑफर

News Desk