मुंबई | चीनच्या वुहान प्रांतातून कोरोना वायरसची सुरुवता झाली. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या बुधवारी (1८ मार्च) दुपारी २, १९,०३३ वर पोहोचली आहे. आता कोरोना वायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातला आहे. भारतातही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्या भारतात कोरोना बाधितांचा आकडा १६९ रुग्णांचा आकडा गेला तर राज्यात ४७ कोरोना पॉझिटिव्ह आहे.
मुंबई आणि उल्हासनगरमध्ये कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे राज्यातल कोरोना बाधित रुग्णांची संख्या 47 झाली आहे. 47 पैकी मुंबईमधील एका व्यक्तीचा 17 मार्चला मृत्यू झालेला आहे.कोरोना बाधित रुग्णांना विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.#CoronaVirusUpdates#LetsFightCorona
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 19, 2020
राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज निम्मे कर्मचारी येतील, या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील. तसेच रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
सध्या भारतात कोरोना बाधितांचा आकडा १६९ रुग्णांचा आकडा गेला तर राज्यात ४७ कोरोना पॉझिटिव्ह आहे. तर देशात कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्र तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये १, दिल्लीमध्ये ११, हरियाणामध्ये १६, कर्नाटकात १३, केरळमध्ये २७, महाराष्ट्रात ४७, पंजाबमध्ये ३, तेलंगणामध्ये १२, राजस्थान ७, उत्तर प्रदेशमध्ये १७, लडाख ८, तमिळनाडू २, जम्मू-काश्मीर ४ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. युरोपमध्ये एकूण ३ हाजार ४२१ आणि आशियामध्ये ३ हजार ३८४ मृत्यू झाले आहेत.
आजपासून तीन ठिकाणी कोरोनाची तपासणी होणार
राज्यात आजपासून (१९ मार्च) जे. जे. रुग्णालय, केईएम रुग्णालय आणि बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाचा तपासणी होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल(१८ मार्च) पुणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आठ ठिकाणी नवीन तपासणी लॅब सुरु करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. या नव्या लॅबसाठी एनआयव्हीकडून उपकरण मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात असा आहे कोरोना रुग्णांची संख्या
पुणे- १९
मुंबई – ९
नागपुर – ४
यवतमाळ – ३
नवी मुंबई – ३
कल्याण- ३
रायगड – १
अहमदनगर – १
औरंगाबाद – १
रत्नागिरी – १
ठाणे – १
उल्हासनगर – १
एकूण – ४७
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.