HW News Marathi
देश / विदेश

जाणून घ्या…भाजपच्या विधान परिषदेच्या ४ उमेदवारांबद्दल ही माहिती 

मुंबई | राज्यात विधान परिषदेच्या ९ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया येत्या २१ मे रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर, आज (८ मे) भाजपकडून आपल्या ४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यावेळी भाजपकडून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, प्रवीण दटके या ४ उमेदवारांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपच्या ‘या’ विधान परिषदेच्या चारही उमेदवारांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

रणजितसिंह मोहिते-पाटील

रणजितसिंह मोहिते-पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आहेत. यंदाच्या लोकसभेच्या काळात तब्बल वर्षभरापूर्वी २० मार्च २०१९ रोजी रणजितसिंह मोहिते -पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून माढा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज रणजितसिंह मोहिते-पाटलांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकून भाजपला साथ दिली. त्यानंतर वर्षभरात भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटलांना कोणतेच पद, कोणतीच उमेदवारी मिळाली नव्हती. आता मात्र पक्षाकडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांनाविधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.

गोपीचंद पडळकर

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देऊन धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी ३० सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी २६ सप्टेंबर रोजी गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर यंदाच्या विधानसभेत पडळकर यांनी बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर, आता भाजपकडून गोपीचंद पडळकर यांनाराज्याच्या विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रवीण दटके

प्रवीण दटके हे नागपूरचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक आहेत. भाजप नेते प्रभाकरराव दटके यांचे ते पुत्र आहेत. प्रवीण दटके हे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील आहेत. तसेच त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यानंतर आता पक्षाकडून प्रवीण दटके यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.

अजित गोपछडे

डॉ. अजित गोपछडे हे गेली तब्बल ३० वर्षे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिले आहेत. नांदेडचे अजित गोपछडे हे सध्या भाजपच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. याकाळात त्यांनी महाराष्ट्रातील डॉक्टरांचे संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे ते संचालकही आहेत. अत्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून त्यांना संधी देण्यात आली होती. तर आता पक्षाकडून विधान परिषदेची संधी मिळाल्यानंतर अजित गोपछडे यांना आपल्या निष्ठेचे फळ मिळाल्याचे म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर बनवण्याच्या मोदींचा संकल्प

News Desk

देशातील ‘हे’ पहिले राज्य झाले ‘कोरोनामुक्त’, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

News Desk

#ITraidsHWNews | HW च्या ऑफिसवर Income Tax ची धाड

News Desk