HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूर शिवसैनिक बेळगावच्या दिशेने लाल-पिवळा ध्वज हटवण्यासाठी रवाना

कोल्हापूर | सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा लाल-पिवळा ध्वज त्वरित हटावावा, अशी मागणी करत बेळगावमध्ये जाऊन आम्ही भगवा ध्वज फडकावणारच अशी गर्जना करुन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावकडे कूच केली आहे. यासाठी बेळगाव सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.

बेळगाव महापालिकेसमोर कन्नक रक्षक संघटनेने लाल पिवळा ध्वज बेकायदेशीररित्या लावला आहे. हा ध्वज त्वरित हटवावा या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चा आयोजित केला होता. मात्र या मोर्चाला बेळगाव जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर ठरल्याप्रमाणे अनेक शिवसैनिक बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. आम्ही जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून भगवा फडकवणारच, असा निर्धार शिवसेनेने केला आहे.

शिनोळी या गावातून भगवा झेंडा घेऊन शिवसैनिकांनी बेळगावकडे मार्गक्रमण केलं आहे. मात्र शिवसैनिकांना कर्नाटक पोलीस परवानगी देणार का?, असा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण मागील काही आंदोलने, मोर्चे पाहता मराठी भाषिकांना तसंच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांविरोधात कर्नाटक पोलिस दडपशाही करत आलेलं आहे. चंदगड तालुक्यातील शिनोळी गावापासून शिवसेनेचे आंदोलन सुरु होणार असून दुपारी १२च्या सुमारास शिवसैनिक बेळगावमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु त्याअगोदर कर्नाटक पोलिस सतर्क झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात

News Desk

पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होईपर्यंत पालकांकडून फी मागू नये

swarit

मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता! – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Aprna