HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूर, सोलापूर, जळगावकरांसाठीही लवकरच विमानसेवा!

मुंबई – केंद्र शासनाच्या ‘उडाण’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यातील नांदेड ते हैद्राबाद विमानसेवा किफायतशीर दरात सुरू झाली आहे. त्यापाठोपाठ आता कोल्हापूर, सोलापूर आणि जळगावकरांनाही लवकरच विमान प्रवास अनुभवता येणार आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत ही तिन्ही विमानतळे ‘उडान’साठी सज्ज करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

उडान या योजनेअंतर्गत निमशहरी भागांतील आतापर्यंत वापरात नसलेली विमानतळे वापरात आणण्यात येणार आहेत. तेथून लहान आकाराची विमाने उड्डाण करणार असून त्यातील निम्म्या जागांचे तिकीट 2500 रुपये असणार आहे. तर निम्मी तिकिटे कंपनीला बाजारभावाने विकता येणार आहेत. 2500 च्या तिकिटांसाठी केंद्राकडून कंपनीला अनुदान दिले जाणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलयुक्त शिवारची चौकशी म्हणजे महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांच्या श्रमाचीच चौकशी करणार काय?

News Desk

महापौरांना आलेल्या धमकीच्या पत्राबाबतचा तपास लवकरात लवकर पूर्ण करणार! – गृहमंत्री 

Aprna

आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना पोलिस अधिकाऱ्याची मदत

News Desk