HW News Marathi
महाराष्ट्र

कोपर्डी प्रकरणातील आरोपीवर हल्लेखोरांना ५ वर्षाची सक्तमजुरी

अहमदनगर | कोपर्डी बलात्कार प्रकरणामुळे या अमानवीय क्रूर घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरुन केला होता. या हल्लेखोरांवर शिक्षा सुनावताना सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेण्यात आला. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे आरोपीना न्यायालयात नेहताना यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. तेव्हा कडक पोलीस बंदोबस्तामुळे हल्लेखोरांना पकडण्यात आले.

जिवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आधारावर या कलमाच्या आधारावर नगरच्या जिल्हा सत्र न्यायलयाने चार जणांवर पाच वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी १९ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अमोल सुखदेव खुणे (२५), बाबुराव वामन वाळेकर (३०), गणेश परमेश्वर खुणे (२८), राजेंद्र बाळासाहेब जराड (२१) अशी या दोषींची नावे आहेत. या चार जणांनी कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपीवर हल्ला केल्यामुळे त्यांना ही शिक्षा झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची जागा शिवसेनेने लढावी”, संजय राऊतांचे विधान

Aprna

‘सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम राज्यातील सर्व कार्यालयात कार्यक्षमपणे राबवावा! – मुख्यमंत्री

Aprna

सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवावी – राजू शेट्टी

News Desk