HW News Marathi
महाराष्ट्र

संतापजनक! ऊस वाहतूक गाडी मालकाने १३ ऊसतोड मजुरांसह ९ लहान मुलांना ठेवले डांबून

बीड | राज्यात आज सर्वत्र कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, या कामगार दिनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यात धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. कारखान्याचा पट्टा पडल्यानंतर घेतलेल्या उचलीमधील पैसे फिरल्याने,१३ महिला-पुरुष मजुरांसह त्यांच्या ९ लहान मुलांना डांबून ठेवले आहे, असा आरोप पीडित कुटुंबातील नातेवाईकांनी केला आहे. यामुळे वृद्ध आजीसह इतर नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेतली.

बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या वारोळा गावातील व गेवराईच्या भेंड खुर्द गावातील ऊसतोड मजूरांनी, ट्रॅक्टर मालक दत्ता दगडू गव्हाणे यांच्याकडून ऊस तोडणीसाठी पैशाची उचल घेतली होती. त्यांनतर त्यांनी कर्नाटक येथील ओम शुगर साखर कारखाना येथे जाऊन ६ महिने ऊस तोडणीचे कामही केले आहे. तर गेल्या आठ ते नऊ दिवसांपूर्वी कारखान्याचा पट्टा पडला आहे. मात्र, ऊसतोडीसाठी घेतलेल्या ऊचली पैकी काही पैसे मजुरांकडून फिरतात. यामुळे गाडी मालक दत्ता गव्हाणे यांनी त्यांना डांबून ठेवल्याचा आरोप वृद्ध केसरबाई आडगळे, परमेश्वर गायकवाड यांच्यासह अनेकांनी केला आहे.

यामध्ये मदन आडागळे, उषा मदन आडागळे, जानवी मदन आडागळे, विष्णू गायकवाड, मंगल विष्णू गायकवाड, कचरु गायकवाड, राजूबाई कचरू गायकवाड, दीपक वाव्हळ, आशा दीपक वाव्हळ, बाळू पंडित, रेश्मा बाळू पंडित, सिंधुबाई पंडीत, रतन जाधव, छाया रतन जाधव यांच्यासह लहान मुलामुलींचा समावेश असल्याचे नातेवाईकांनी सांगितल आहे. तर गेल्या आठ दिवसांपासून कारखान्याचा पट्टा पडलाय. पण माझा मुलगा, सून, नात आली नाही. पैशासाठी डांबून ठेवलेय त्यांना सोडवा, त्यांना आणून द्या, त्यांना मारहाण केली जात आहे, असे म्हणत वृद्ध केशरबाई आडागळे यांना अश्रू अनावर झाले आणि त्या ढसाढसा रडल्या.

या विषयी तक्रारदार ऊसतोड मजूर परमेश्वर गायकवाड म्हणाले, “मी माझी बायको, आई, वडील, भाऊ त्याची बायको, कारखान्याला ऊस तोडण्यासाठी गेलो होतो. मात्र, पंधरा दिवसापूर्वी माझा मुलगा खूप आजारी असून त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मी गावी बीडला आलो होतो. मात्र, गेल्या आठ दिवसांपूर्वी कारखान्याचा पट्टा पडला आहे. कारखान्याहून आठ दिवसांपूर्वी आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती आणि इतर मजूर निघाले आहेत.

मात्र, ते अद्याप पर्यंत घरी आले नाहीत. उचलीमधील फिरलेल्या पैशामुळे त्यांना दत्ता चव्हाण डांबून ठेवले असून त्यांना मारहाण देखील करत आहे, असा आरोप गायकवाड यांनी केला. पुढे ते म्हणाले, आता आमच्याकडे पैसे नाहीत, सहा महिने कारखान्याला होतोत. तुम्हाला एक महिन्यानंतर उचल सुरू झाल्या. तोपर्यंत आमच्या घराचे कागदपत्र तुमच्याकडे ठेवा. मात्र, तो ऐकत नाही. त्यानी सर्वांना कुठंतरी डांबून ठेलवलेय. तर या मजुरात मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा संशय देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आज राज्यात कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना. सामाजिक न्याय मंत्रीपद असणाऱ्या आणि डझनभर ऊसतोड मजुरांचे नेते असणाऱ्या बीड जिल्ह्यात, कामगारांनाचे डांबून ठेवल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या कामगार दिनानिमित्त, पालकमंत्र्यांसह डझनभर ऊसतोड मजूर नेते समोर येऊन या कामगारांची सुटका करणार का? आणि त्या रडणाऱ्या वृद्ध आज्जीच्या आणि इतर नातेवाकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणार का? हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“या सगळ्यांचे गॉडफादर उद्धव ठाकरे”, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप!

News Desk

शेतकऱ्यांनी दाखवलेल्या एकजुटीचा अखेर विजय – छगन भुजबळ

News Desk

एक दिवस देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील, संजय राऊतांचा दावा

News Desk