पुणे | पुण्यातही रुग्ण वाढू लागल्यानंतर त्याचा आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे.राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर, बेड्स यांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुण्यात देखील ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील योग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टर अभिजीत दरक यांनीच ही माहिती दिल्यामुळे ऑक्सिजन तुटवड्याचं भीषण वास्तव समोर येऊ लागलं आहे. दरम्याना, रुग्णलयात गेल्या २ दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं देखील डॉ. अभिजीत दरक यांनी सांगितलं आहे.
योग हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. यामध्ये डॉ. अभिजीत दरक यांनी एएनआयशी बोलत सविस्तर माहिती दिली आहे. “ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या २ दिवसांपासून आम्ही लिक्विड ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे त्रस्त आहोत. सध्या रुग्णालयात ११ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आणि आमच्याकडे आत्ता फक्त तासभर पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा आहे”, असल्याची माहिती डॉ. दरक यांनी दिली आहे.
Yog Multispeciality Hospital in Pune runs out of oxygen supply.
One patient has died due to lack of oxygen supply. For last 2 days, we're struggling due to lack of liquid oxygen. Currently, 11 patients are on ventilators. We've only an hour's supply left: Dr Abhijeet Darak pic.twitter.com/AP4hZOuFnr
— ANI (@ANI) April 20, 2021
दरम्यान, डॉ. दरक यांनी दिलेल्या माहितीनुसार, योग हॉस्पिटलमध्ये १४ आयसीयू बेड आणि २३ ऑक्सिजन बेड आहेत. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २० ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्याचं आश्वासन योग हॉस्पिटलला दिलं होतं. मात्र, रुग्णालय प्रशासनाला हा ऑक्सिजनचा पुरवठा नेमका कधी होईल, याची कोणतीही खात्री नाही. शिवाय, हे २० सिलेंडर आल्यानंतर देखील तो ऑक्सिजन फक्त पुढचे ३ ते ४ तास पुरेल, असं देखील डॉ. दरक यांनी सांगितलं आहे.
Pune: We have 14 ICU beds & 23 oxygen beds. The district collector has assured supply of 20 oxygen cylinders but hospital administration is not aware when will it reach them. If those cylinders reach, they can last for another 3 to 4 hours: Dr Abhijeet Darak pic.twitter.com/bwtuNitxNW
— ANI (@ANI) April 20, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.