HW News Marathi
Covid-19

नाशिकमध्ये देशातील पहिल्या ई-न्यायालयाची सुरुवात

नाशिक | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देशातील पहिल्या ई-न्यायालयाला सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या हस्ते या पहिल्या ई-न्यायालयाचे उदघाटन झाले आहे. न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. दीपंकर दत्ता यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या न्यायालयाचे उदघाटन करण्यात आले आहे. येत्या १ ऑगस्टपासून या न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. या ऑनलाईन कामकाजामुळे अधिक पारदर्शकता येईल, असे देखील म्हटले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणी होऊ शकत नाही. त्यामुळे, सध्याच्या स्थितीत ई-न्यायालय हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.

ई-न्यायालयाच्या माध्यमातून न्यायालयात खटले दाखल करण्यापासून युक्तिवादापर्यंत सर्वकाही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्यांदा नाशिकमध्ये हे ई-न्यायालय सुरु होत आहे. या ई-न्यायालयाच्या उदघाटनादरम्यान नाशिकचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या कार्यक्रमाला उपस्थित होते. कोरोनाच्या काळात न्यायालये बंद होती. मात्र, ई-न्यायालयाच्या माध्यमातून या काळात न्यायालयावर आलेला ताणही काहीसा कमी होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात २ स्वयंसेवकांना दिला ‘कोविशिल्ड’ लसीचा डोस 

News Desk

कर्मभूमीला सोडण्यास भाग पाडल्यानंतर त्यांची काळजी करण्याचे नाटक करु नका !

News Desk

केंद्र सरकार २-३ दिवसांत नवे पॅकेज जाहीर करणार- नितीन गडकरी

News Desk