HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडी किंवा राज्यपालांकडून विधानपरिषदेच्या जागेसाठी माझा विचार करावा | सुरेखा पुणेकर

मुंबई | सध्या महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागांची चर्चा सुरू आहे. राज्यपाल कोट्यातून १२ जागा असतात. यात महाविकासआघाडीतील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षात या तिन्ही पक्षाकडून अद्याप कोणी किती जागा घेणार यासंदर्भात अद्याप काही निर्णय झाला नाही. मात्र, तिन्ही पक्षाकडून राज्यपाल नियुक्त जागांसाठी फिल्डिंग लावली जात आहे.

दरम्यान, “लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी मविकासआघाडी किंवा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माझ्या नावाचा विचार करावा,” अशी असे त्या म्हटल्या आहेत. याआधी सुरेखा पुणेकर यांना काँग्रेसकडून पुणे लोकसभा मतदारसंघासाठी चर्चा झाली होती. पण, त्यांना उमेदवारी मिळली नाही. आता विधानपरिषदेला तरी उमेदवारी मिळावी, अशी आशा सुरेखा पुणेकर यांनी बाळगली आहेतस, असे त्यांनी एका डिजिटल पोर्टलशी बोलताना सांगितले.

लावणी कलाकारांच्या प्रश्नांना वाचा फोडलेली नाही

लोककलावंतांच्या प्रश्नावर बोलताना सुरेखा पुणेकर म्हणाल्या, ‘लावणी, तमाशा या कलेला आज समाजात मानाचे स्थान आहे. पण, तमाशा कलावंतांची अवस्था खूप वाईट आहे. कलावंत सगळ्यांचं मनोरंजन करतो. पण, त्यांचे हाल पाहवत नाहीत. आजवर एकाही आमदार किंवा खासदाराने त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडलेली नाही. त्यामुळेच मला त्यांचे प्रतिनिधित्व करायच आहे.’

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड जिल्हा बॅंक निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय ! पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणतात..

News Desk

राज्यपाल कोश्यारींनी अभिभाषण अर्धवट सोडणे ‘हा’ महाराष्ट्राचा अपमान! – नाना पटोले

Aprna

घरोघरी राष्ट्रवादीची घडी!, परळी शहारत प्रत्येक रविवारी धनंजय मुंडे मतदात्यांच्या दारी

News Desk