मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या सह अन्य आरोपींची अंतरिम जामिनावर सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल (११ नोव्हेंबर) दिले होते. या आदेशानंतर अर्णव गोस्वामी यांना तुरुंगातून सोडण्यात आले. अर्णब गोस्वामीच्या सुटके नंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच सदर प्रकरणावर स्टँडअप कॉमेडीयन कुुणाल कामराने खोचक ट्विट केले. यानंतर वकील रिझवान सिद्दीकी यांनी देशाच्या अॅटर्नी जनरल यांनी पत्र लिहीत अवमानना खटला दाखल करण्याची मागणी केली आहे.
Advocate @RizwanSiddiquee file an application before Attorney General Against @kunalkamra88 seeking sanction to initiate Criminal #ContemptOfCourt Proceedings against him #ArnabGoswami pic.twitter.com/cz8HAvV3Oa
— Live Law (@LiveLawIndia) November 11, 2020
सुप्रीम कोर्टाने काल अर्णब गोस्वामी आणि इतर दोन आरोपींची अंतरिम जामीनावर सुटका करण्याचा आदेश दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अर्णब गोस्वामी यांना रात्री जेलमधून सोडण्यात आलं. त्यांच्या सुटकेनंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. याबाबत कुणाल कामरानेही ट्वीट केलं होतं. ज्यात त्याने लिहिलं होतं की, “ज्या वेगाने सुप्रीम कोर्ट देशातील महत्त्वाचे मुद्दे मार्गी लावत आहे ते पाहता लवकरच महात्मा गांधीजींच्या फोटोची जागा हरिश साळवे घेतील.”
काय आहे प्रकरण?
पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. हायकोर्टाने जामीन देण्यास नकार दिल्यानंतर गोस्वामी यांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठवलं होतं. कोर्टाने बुधवारी (11 नोव्हेंबर) त्यांना अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर त्यांनी तळोजा तुरुंगातून सुटका झाली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.