HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

३ दिवसांत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढा नाहीतर…बच्चू कडूंचा केंद्राला इशारा

मुंबई | केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून देशभरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या २ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. आता या लढ्याची झळ दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. शेतकरी गेल्या 4 दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलनाच्या तयारीत असून, जंतर-मंतरवर आंदोलन करण्याला परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

दरम्यान, दिल्लीतील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटत आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला अल्टिमेटम दिला आहे. केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ दिले द्यावे आणि त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा. जर ३ दिवसांत तोडगा निघाला नाही तर या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार असल्याची धमकीच बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला दिली आहे.

Related posts

#COVID19 : जाणून घ्या… देशातील कोणत्या राज्यात किती कोरोना रुग्ण ?

News Desk

कृषी विद्यापीठात ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा गुणपत्रिकेवर मारला शिक्का !

News Desk

१० लाख मराठा उतरणार मुंबईच्या रस्त्यांवर!

News Desk