HW News Marathi
महाराष्ट्र

मविआ सरकार ‘हे’ इतिहासातील सर्वात भ्रष्टचारी सरकार! – देवेंद्र फडणवीस

मुंबई | ‘मविआ सरकार हे इतिहासातील सर्वात भ्रष्टचारी सरकार आहे,’ असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्याचे विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून (३ मार्च) सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी आज (२ मार्च) पत्रकार परिषद घेऊन महाविकासआघाडी सरकावर हल्लाबोल केला आहे. राज्यमधील भ्रष्टाचार, मराठा आणि ओबीसी आरक्षण, शेतकरी आणि आदी मुद्यांवर सरकारवर टीका केली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चाहापान्यावर भाजपने बहिष्कार टाकल्याची माहिती फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे

फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रच नव्हे, देशाच्या इतिहासात जे घडले ना ते सर्व महाराष्ट्राने पाहिले. १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमच्या जवळच्या लोकांशी केलेला आर्थिक व्यवहाराप्रकरणी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मलिकांना वाचवण्यासाठी महाविकासआघाडी सरकार उभे राहिले आहे. हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. मलिक ईडीच्या कोठडीत असूनही त्यांचे मंत्री पद अद्याप कायम आहे. मलिकांचा राजीना घ्यालाच पाहिजे, असे म्हणत त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. 

मविआमुळे मराठा समाजाचे आरक्षण गेले – फडणवीस

मराठा आरक्षण हे महाविकासआघाडी सरकारमुळे केल्याचा आरोप फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केला आहे. यामुभे संभाजीराजे यांना संभाजीराजेंना उपोषण करावे लागते हे महाविकासआघाडी सरकारचे अपयश आहे. या पार्श्वभूमीवर भाजप अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारला अधिवेशनात घेरणार असल्याची कल्पना फडणवीसांनी दिली आहे. 

 बेवड्यांना समर्पित ठाकरे सरकार

ठाकरे सरकारने नुकतेच किराणा दुकानात वाईन उपलब्ध होणार आहे, असा निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्यात आला होता. यावरून फडणवीसांनी महविकासआघाडी सरकारवर टीका केली. फडणवीस म्हणाले, ठाकरे सरकार बेवड्यांना समर्पित सरकार असून जेवढे बेवड्यांसाठी निर्णय घेतले, तेवढे शेतकऱ्यांसदर्भात घेतले नाही, असे म्हणत राज्य सरकारवर टीका  केली आहे 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगलीतील मृत्युदर राज्यात सर्वाधिक, जयंत पाटलांनी राजीनामा द्यावा !

News Desk

संजय राठोड यांच्या राजीनाम्याबद्दल महंतांनी दिली ‘ही’ माहिती

News Desk

अखेर राज्यपालांकडून निमंत्रण! अजित पवार म्हणाले…..

News Desk