मुंबई | काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची सोमवारी (२४ जून) अखेर विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली आहे. नुकतीच विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोणाची निवड होणार याबाबत चर्चा सुरु होती. दरम्यान, या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करत मंत्रिपदही मिळविले.
Senior Congress leader Vijay Wadettiwar appointed as the new leader of Opposition (LoP) in the Maharashtra Legislative Assembly. pic.twitter.com/MHgH6DZvLj
— ANI (@ANI) June 24, 2019
https://twitter.com/INCMaharashtra/status/1143083689439444992
विजय वडेट्टीवार यांची पार्श्वभूमी
नुकतीच विरोधी पक्षनेते पदी निवड झालेले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्याचे आहेत. विशेष म्हणजे वडेट्टीवार यांच्यामुळे विदर्भाला पहिला विरोधी पक्षनेता मिळाला आहे. शिवसेनेच्या युवा संघटनेतून वडेट्टीवार यांनी राजकारणात प्रवेश केला. वडेट्टीवार यांनी शेतमजूर, आदिवासींच्या हक्कांसाठी अनेक आंदोलने केली आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. विरोधीपक्षनेते पदासाठी एक प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.