HW News Marathi
महाराष्ट्र

आजच्या वटपौर्णिमा सणानिमित्ताने जाणून घ्या… व्रतकथा, महत्व अन् मुहूर्त

संपूर्ण देश आज कोरोनाचे संकटचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व महिलांनी आज (५ जून) शक्यतो घरीच राहून वटसावित्री व्रताचरण करून पूजन करावे, असे आवाहन केले जात आहे. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. या ठिकाणी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमदेवांकडून परत आणले होते. तेव्हापासून पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे. यात सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाचे ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात.

वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्यलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते. वटसावित्रीचे व्र हे तीन दिवसीय व्रत असते. मात्र, ज्या महिलांना तीन दिवस व्रत करणे शक्य नसेल. त्या महिला केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी व्रताचे आचरावे, असे शास्त्रात सांगितले आहे. वटपौर्णिमेबरोबर आज जागतिक पर्वावरण दिवस आहे. पर्यावरणच्या दृष्टीनेही वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही पूजेचा एक हेतू असल्याचे बोले जाते.

वटपौर्णिमाच्या व्रताचा मुहूर्त

वटपौर्णिमाः ५ जून २०२०

पौर्णिमा प्रारंभः ५ जून २०२० रोजी उत्तर रात्रौ ३ वाजून १५ मिनिटे.

पौर्णिमा समाप्तीः ६ जून २०२० रोजी रात्री १२ वाजून ४२ मिनिटे

पारंपरिक कथा

अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.

सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्रकारांना जोड्याने मारण्याची भाषा करणा-या भाजप मंत्र्याची मस्ती जनताच उतरवेलः सचिन सावंत

News Desk

राजभवन येथील हवामान केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

Aprna

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषी योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा! – अब्दुल सत्तार

Aprna