HW News Marathi
महाराष्ट्र

निश्चय करुया मुख्यमंत्री उध्दव ठाकरे…!

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेला संबोधित करत आहेत. राज्यातील 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर 11 जिल्ह्यात अद्यापही लेवल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.

कोरोनाची ही टांगती तलवार उधळून लावू

सात दिवसांनी आपला स्वातंत्र्या दिन येतोय. ७५ वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. स्वातंत्र्य दिन म्हटल्यानंतर एक इतिहास वाचत असताना त्यावेळच्या पिढीने कसं झोकून देऊन संघर्ष केलं, त्या काळच्या फक्त आठवणी काढून उपयोग नाही. आपल्याला कोरोना संकट जाईल असं वाटलं होतं. कमी-जास्त प्रमाणात लाटा धडकत आहेत. किती लाटा येतील याचा अजूनही अंदाज नाही. म्हणून या स्वातंत्र्य दिनाच्या आठ दिवस आधीच मी आपल्याला नम्र विनंती करतो. तो संघर्ष फक्त आठवायचा नाही तर आपणही आता निश्चय केला पाहिजे की, प्रतिज्ञा घेतली पाहिजे. जसं आपण दीडशे वर्षांचं राज्य उधळून लावलं. तसंच कोरोनाची ही टांगती तलवार उधळून लावू, ती उलथून टाकूच.

दरड ग्रस्तांसाठी मोठा निधी

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने हाहाकार माजवला होता आणि याच वेळी अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली तर अनेकांचे संसार पुरात वाहून गेले तर काहींना आपले प्राणही गमवावे लागले याच पार्श्वभूमीवर ग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून साडेअकरा हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित करताना दिली.

मुख्यमंत्र्यांकडून नीरज चोप्राच अभिनंदन

बऱ्याच दिवसांनंतर आपल्याशी संवाद साधतोय. मधल्या काळात काय-काय घडलं आणि घडतंय हे आपण पाहिलं. एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती, कोरोना संकट आणि दुसऱ्या बाजूला ऑलिम्पिक सुरु आहे. ऑलिम्पिकमध्ये आपले खेळाडू प्रयत्नांची पराकष्ठा करत आहेत. विशेषत: नीरज चोप्राचं अभिनंदन केलंच पाहिजे. कारण त्याने देशाची मान उंचावलं आहे. त्याने सुवर्ण पदक मिळावलं आहे. सगळेच खेळाडू मेहनत करत आहेत. खेळात हार-जीत होत असते. ते त्याच पद्धतीने घेतलं पाहिजे.

व्यापाऱ्यांना काय आवाहन करतील

राज्यातील व्यापारी वर्गात मोठी नाराजी नाही. पुण्यातील व्यापाऱ्यांनी सरकारचे नियम धुडकावून लावत दुकानं संध्याकाळपर्यंत सुरु ठेवली आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सच्या मालकांनीही नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी अजून तरी हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना पूर्ण मुभा देणं शक्य नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. दुसरीकडे कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी यासाठी भाजप, मनसे या विरोधी पक्षांसह सर्वसामान्य नागरिक आणि प्रवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे

मुख्यमंत्र्यांवर अनेक टीका झाल्या तरी ते खचले नाहीत

दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी पुढे म्हटलं आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर इतर देशांची परिस्थिती बघतो आहे. नाशिकमध्ये डेल्टाचे ३० रुग्ण मिळाले आहेत. यामुळे सगळ्या जिल्ह्यांतील कोरोना परिस्थितीचा विचार करुनच मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील आणि नागरिकांना दिलासा देतील. मुख्यमंत्र्यांवर अनेक टीका झाल्या तरी ते खचले नाहीत तर त्याच्या कामाचे कौतुक झाले तर भारावले नाहीत ते योग्य निर्णय घेऊन कोरोना परिस्थिती हाताळण्याचे काम करत असल्याचेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संघटनात्मक चर्चा केली

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संघटनात्मक चर्चा केली, संघटना वाढी संदर्भात, नेत्यांसंदर्भात, उपाययोजना आणि उपक्रम योजनासंदर्भात चर्चा केली असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच मी जेव्हा भेटतो तेव्हा संघटनात्मक विषयांवरच चर्चा करतो असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेना खासदार संसदेत चर्चा करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरजच नाही”, भाजप नेत्याचा अजब तर्क

News Desk

नैसर्गिक आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याना संपन्न करणार! – उपमुख्यमंत्री

Aprna

NCB च्या समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत नाही, गृहमंत्री वळसे-पाटलांची माहिती!

News Desk