HW News Marathi
महाराष्ट्र

परमबीर सिंग यांनी 3.5 कोटींची खंडणी वसुली केली, बुकीनेही टाकला लेटर बॉम्ब

मुंबई | क्रिकेट बूकी सोनू जालान याने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्यावर वसुलीचा आरोप केला आहे. सोनू जालानने परमबीरसिंग यांच्या विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे लेखी अर्ज दिला आहे.

मुंबईचे माझी पोलीस आयुक्त आणि राज्य सरकार यांच्यातील वाद हायकोर्टापर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर परमबीर सिंग यांच्या विरोधात एका पाठोपाठ एक लेटरबॉम्ब समोर येत आहेत. सोमवारी तर चक्क क्रिकेट बुकी सोनू जलाल यानं परमवी यांच्यावर आरोप केले आहेत.

परमबीर सिंग यांनी वसुली केल्याचा आरोप बुकी सोनू जलालनं केला आहे. विशेष म्हणजे सोनू जालानने याबाबत पोलीस महासंचालक संजय पांडे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांना लेखी पत्र लिहून तक्रार केली आहे.

२०१८ साली परमबीरसिंग यांनी मकोका लावून ३ कोटी ४५ लाख वसूल केल्याचा सोनू जालान याचा आरोप आहे. या पञात निवृत्त पोलिस निरिक्षक प्रदिप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे, के. टी. कदम यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे प्रकरण पोलिस महासंचालक DGP कार्यालयाकडून स्टेट सीआयडीला वर्ग केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आणखी एक बूकी केतन तन्ना उर्फ राजा यानेही परमबीर सिंग यांच्यावर पैसे वसुलीचा आरोप केला आहे. परमबीर सिंग यांनी आपल्याकडून १ कोटी २५ लाख वसूल केल्याचा तन्नाचा दावा आहे. परमबीर यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांची चौकशी करा, आम्ही दोषी असू तर आमच्यावर कारवाई करा, पण न्याय द्या अशी मागणी या दोघांनी केली आहे. या व्यतिरिक्त मुनीर अहमद मोहमद शिरीन पठाण (मुनीर खान) या बुकीनेही परमबीरसिंग यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या तिन्ही तक्रारींमधला तपशील जवळपास सारखा आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर होत असलेल्या आरोपांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे परमबीर यांच्या अडचणींमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलिस अधिकाऱ्यांनंतर आता एका क्रिकेट बुकीनं परमबीर सिंग यांच्यावर वसुलीचे आरोप केले आहेत. यापूर्वी अनुप डांगे आणि अकोल्याच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं परमबीर सिंग यांच्या विरोधात गंभीर आरोप करणारी पत्रं मुख्यमंत्र्यांना लिहिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड जिल्ह्यासाठी “एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी” ची आगामी तीन वर्षासाठी निवड!

News Desk

शरद पवारांना नास्तिक आहेत म्हटले…!, राज ठाकरेंनी टोला लगावला

Aprna

कुशल व्यंगचित्रकार व शब्दांवर प्रभुत्व असलेले उत्कृष्ठ वक्ते बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन, शरद पवारांनी केले ट्विट  

News Desk