मुंबई | उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या ‘अँटिलिया’ इमारतीबाहेर संशयित स्कॉर्पिओ गाडी आढळल्याने खळबळ उडाली होती. असे असताना आता नवी माहिती समोर आली आहे, त्यामध्ये संशयित कारमधून धमकीचे पत्र मिळाले. मोडक्या-तोडक्या इंग्रजी भाषेत हे पत्र लिहिण्यात आले असून, ‘मुकेश भैय्या-नीता भाभी, हा तर एक ट्रेलर आहे’, असे लिहिले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हाताने लिहिलेल्या या पत्रात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना उद्देशून हे पत्र लिहिण्यात आले. यामध्ये धमकी दिली गेली, की मुकेश भाई आताचा हा ट्रेलर आहे. तुमच्या पूर्ण कुटुंबाला संपविण्याची तयारी केली गेली आहे. या पत्रानंतर पोलिसांकडून मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ इमारतीभोवती मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अंबानी यांच्या बिल्डिंगजवळ सापडलेल्या या कारमध्ये 20 जिलेटिनच्या कांडया आढळल्या आहेत. तसेच कारची नंबरप्लेटही संशयित स्वरुपात मिळाली.
दरम्यान, याबाबत मुंबई पोलिसांच्या प्रवत्याने सांगितले, की गामदेवी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी संबंधितांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.