नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात ४ मेपासून तिसऱ्या लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. हा लॉकडाऊन १७ मेपर्यंत असणार आहे. दरम्यान, ३ मेनंतर ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल होणार आहे. तसेच, या झोनमधील दारुची दुकानेही सुरु करण्याची सशर्त परवानगी केंद्राने दिली आहे.
मात्र, ग्राहकांनी दारुच्या दुकानाबाहेर ६ फूट अंतर ठेवून रांग लावण्याची अट सरकारने घातली आहे. दरम्यान, दारुच्या दुकानासोबत पानाची गादीही सोमवारपासून म्हणजे ४ मेपासून सुरु करण्याची परवानगी दिली आहे.
मुंबई, पुणे, दिल्ली रेड झोनमध्ये असल्याने तेथील नागरिकांना कोणताही दिलासा अद्याप मिळाला नाही आहे. दरम्यान, ४ मेपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या लॉकडाऊनची नवी मार्गदर्शक केंद्राकडून लवकरच येतील.
Liquor stores & paan shops will be allowed to function in green zones while ensuring minimum six feet distance (2 gaz ki doori) from each other & ensuring that not more 5 persons are present at one time at the shop: MHA on the extension of #lockdown for two weeks from May 4
— ANI (@ANI) May 1, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.