HW News Marathi
महाराष्ट्र

LIVE UPDATE | मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंद

मुंबई | मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे ५८ मूक मोर्चे काढल्यानंतर मराठे आक्रमक झाल्याचे चित्र महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही बंदची हाक देण्यात आली आहे.

परंतु स्कूल बस, दूध टँकर, रुग्णवाहिका अशा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना व सेवांना बंदमधून वगळण्यात आले आहे.मराठा क्रांती मोर्चातर्फे उर्वरित महाराष्ट्रात मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला असला, तरी पंढरपूरहून मुंबईसह नजीकच्या जिल्ह्यांत परतणा-या वारक-यांना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून मंगळवार ऐवजी बुधवारी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

LIVE UPDATE

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची पत्रकार परिषद –

  • अन्यायाविरुद्ध मराठा समाज एकत्र आला.
  • सरकारमुळे आम्ही हातात दगड, काठ्या घेतल्या.
  • मुंबईकरांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही क्षमस्व.
  • मुंबई बंदला स्थगिती.
  • सकल मराठा समाजाचा बंद स्थगित.
  • मोर्चाकडून शांतता राखण्याचे आवाहन.
  • ठाणे, नवी मुंबईमध्येही स्थगितीचे आवाहन.
  • चाकरमान्यांना घरी येताना त्रास होऊ नये म्हणून घेतला निर्णय.
  • केवळ राजकीय पक्ष नव्हे तर एक समाज मुंबई बंद करु शकतो हे आज सिद्ध झाले.
  • मराठा समाजाचा अपमान, झालेला अन्याय या विरोधात काढलेल्या मूक मोर्चांना सर्व समाजाने दिली साथ.
  • सरकार जर दगड फेका म्हणून सांगत असेल तर पुरोगामी महाराष्ट्रात जनतेचे यापेक्षा मोठी दुर्दैव ते काय.

मराठा मोर्चाचा उद्रेक हे राजकीय नेतृत्वाचे अपयश – संजय राऊत

नेतृत्व बदलण्याचा निर्णय, मोदी, शहा यांनी घ्यावा- संजय राऊत

सरकारने बघ्याच्या भूमिका घेऊ नये – संजय राऊत

भाजपामध्ये मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा सुरु – संजय राऊत

बीड | भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर दगडफेक.

गेवराईचे भाजप आमदार आहेत लक्ष्मण पवार.

मानखुर्दजवळ बेस्टची बस आंदोलकांनी जाळली.

मोहिते पाटील नगर मानखुर्द येथे आंदोलकांनी बसमध्ये पेट्रोलच्या बाटल्या टाकून बस जाळण्याचा प्रयत्न केला. फायर ब्रिग्रेडला बोलवून बस विझविण्यात आली आहे. सदरची बस ही कुर्ला बस आगाराची असून ती ५१७ या बसमार्गावर चालविण्यात येत होती . सदरची घटना १.३० च्या दरम्यान घडली .सदरचा बसमार्ग हा सांताक्रुज ते नेरुळ असा चालतो.बसमधील सीट जळालेल्या आहेत.

साता-यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण.

कळंबोलीत पोलिसांचा आंदोलनकर्त्यांवर लाठी चार्ज.

आंदोलकांच्या दगडफेकीत पोलीस अधिक्षक जखमी.

  • सकल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची आज दुपारी दादरच्या शिवाजी मंदीर येथे पत्रकार परिषद.
  • साता-यात शिवेंद्रराजे भोसले व शशिकांत शिंदे यांना मराठा आंदोलकांनी केला विरोध.
  • परळीतील ठिय्या मोर्चात धनंजय मुंडेंचा सहभाग.
  • परळीतील मराठा आंदोलनात धनंजय मुंडेंचे भाषण.
  • मराठा समाजाच्या आंदोलनात धनंजय मुंडे सहभागी.

मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांनी वरळी नाका परिसरात मुंडन करत सरकारचा निषेध व्यक्त केला.

कल्याण रेल्वे स्टेशन रोडवर नवी मुंबई परिवहन बसच्या काचा फोडल्या.

 

  • मुंबईत ९ बसेसची तोडफोड, सार्वजनिक मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान.
  • दक्षिण मुंबईत बंदचा परिणाम नाही.
  • अहमदनगर आंदोलक रस्त्यावर, वन विभागाची जाळली जीप.
  • सायन पनवेल हायवे आंदोलकांनी रोखला.
  • दादर हिंदमता परिसरात आंदोलकांची घोषणाबाजी.
  • दादर, नायगाव परीसरात आंदोलकांनी दुकाने केली बंद.
  • मोर्चामुळे माजीवाडा परिसरात वाहतूक कोंडी.
  • मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आंदोलक आक्रमक.
  • नालासोपा-याच्या उड्डाणपुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
  • ३ किमी पर्यंत लांब वाहनांच्या रांगा

ठाण्यात आंदोलकांनी लोकल अडवली.

  • आकोल्यात महाराष्ट्र बंदला प्रचंड प्रतिसाद.

 

मंगळवारी मराठा आंदोलनादरम्यान विष प्यायलेल्या मराठा आंदोलकाचा उपचारादरम्यान मृत्यू.

दादरमध्ये आंदोलनाला सुरुवात.

  • भायखळ्याच्या घोडपदेव येथे कडकडीत बंद.

  • बांद्रा येथे मराठा आंदोलकांनी दुकानदारांना दुकान बंद करण्यासाठी केली हात जोडून विनंती.

  • जोगश्वरी स्टेशन परीसरात आंदोलक आक्रमक, आंदोलकांनी केला रेल रोको, वाहतूकीवर परीणाम, वाहतूक १५ मिनिटे उशीरा

  • मानखुर्दमध्ये मराठा आंदोलक उतरले रस्त्यावर.
  • नाशिकमध्ये सर्व दुकाने रहाणार बंद.
  • पोलिसांनी घाटकोपरमधून २ आंदोलकांना घेतले ताब्यात.
  • लोकल रोखण्याचा प्रयत्न, मराठा आंदोलकांच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणा, जोगेश्वरीजवळ आंदोलक झाले आक्रमक.

  • पनवेलमध्ये महाराष्ट्र बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

 

  • ठाणे | माजीवाडा ब्रिजवर टायर जाळले.

  • मुंबईतील बाजारपेठा, वाहतूक, शाळा सुरळीत सुरु.
  • मंत्रालय परीसरात असलेल्या भाजप कार्यालयासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त.

  • ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात टीएमटी बसची तोडफोड

 

  • तीनहात नाक्यावर आंदोलकांची घोषणाबाजी.

  • मुंबईतील बंद शांततेत सुरु.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आज मुंबईत या आंदोलनाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. आजच्या महाराष्ट्र बंदचा कमीत कमी फटका मुंबईला बसावा यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त मुंबईत ठिकठिकाणी ठेवण्यात आला आहे. दादरच्या प्लाझा सिनेमा परीसरात पोलिस मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत.

(छायाचित्र रिपोर्टर : धनंजय दळवी)

 

लातूर | स्थानिक वाहतूक वगळता लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटी बस सोडण्यास वाहतूक नियंत्रकांचा नकार.चालकाला स्वत:च्या जबाबदारीवर एसटी चालविण्याची सूचना. एसटी स्थानकावर आजही शेकडो प्रवासी ताटकळले.

नवी मुंबई | घणसोली नवी मुंबई येथे पहाटे दोन बेस्ट बसवर दगडफेक.

ऐरोली ते वाशी दरम्यान बेस्टची बससेवा बंद.

मुलुंडकडून वाशीच्या दिशेने जाणारी बस सेवा ऐरोली पर्यंत चालविण्यात येत आहे.

मुंबईतील काही भागांमध्ये वाहतूक कमी प्रमाणात होताना पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र बंदचा आज दुसरा दिवस आहे.

  • मुंबईत नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, शिवसेनेकडून मराठा आंदोलकांना आवाहन.
  • मुंबई बंदला शिवसेनेचा पाठिंबा, पण बंदमध्ये सहभाग नाही.
  • मुंबईमध्ये बस , रेल्वे , रिक्षा, टॅक्सी, खाजगी वाहने सुरू. शहरात अद्याप बंदचा परीणाम नाही.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकवणार !

News Desk

अजित पवारांच्या शब्दाला काहीच किंमत राहिली नाही! – देवेंद्र फडणवीस

Aprna

भारतात हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचे ३.२८ कोटी उत्पादन, तर देशाला १ कोटी गोळ्याची गरज | आरोग्य मंत्रालय

News Desk