HW News Marathi
Covid-19

पुणेकरांना लॉकडाऊनमधून एक दिवसाचा दिलासा !

पुणे | राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला. पुण्यात देखील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १० दिवस लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानुसार लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी शहरात सुरू होती. सलग ५ दिवस दुकाने बंद असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी एक दिवसाचा दिलासा पुणेकरांना आज (१९ जुलै) दिला आहे.

आज ( १९ जुलै) पुण्यात सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेले ५ दिवस पुण्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे आज खरेदीसाठी लोकांची गर्दी होऊ नये यासाठी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवून देण्यात आली आहे. भाजीपाला, किराणा माल आणि चिकन- मटणची दुकाने आणि सुरू ठेवण्यासाठी ही परवानगी पुणे महापालिकेने दिली आहे.

सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची ही मुभा फक्त आजच असणार आहे. उद्यापासून (२० जुलै) जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी दुकानांना पुन्हा वेळेची मर्यादा लागू होणार आहे. आज आषाढ महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने लोकांकडून चिकन – मटणची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात श्रावण सुरू होणार आहे त्यामुळे आजचा रविवारचा दिवस मांसाहारी लोकांसाठी शेवटचा आहे त्यामुळे खवयी लोकांना आज मनसोक्त मांसाहार करता येणार आहे.

पिंपरी चिंचवडमधील लॉकडाऊन आज रात्री १२ पासून शिथिल करण्यात आले आहे. या दरम्यान अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी किराणा माल, भाजी विक्रेते आणि मटण-चिकन-मासे-अंडी विक्रेत्यांना मुभा देण्यात आली आहे. तर २० जुलै ते २३ जुलै दरम्यान सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंतच मुभा असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस पुणेकरांसाठी नक्कीच खास असणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळीनंतर राज्यात ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरु, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

News Desk

“मला व्हिलन ठरवलं तरी मी काम करत राहणारचं”, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

News Desk

आज मशिद उघडून नमाज करणार ! मंदिरांनंतर आता इम्तियाज जलील यांचा मशिदीकडे मोर्चा…

News Desk