HW News Marathi
Covid-19

अमरावतीत लॉकडाऊन आणखी ७ दिवसांसाठी वाढवला

अमरावती | राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांत लॉकडाऊन पुन्हा लावण्यात आला आहे. काही ठिकाणी निर्बंध कडक करण्यात आले आहेत. असं असताना अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन आणखी ७ दिवसांसाठी वाढवला आहे. लॉकडाऊनमध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली नसल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. २२ फेब्रुवारी रात्रीपासून १ मार्चपर्यंत लॉकडाऊनचा पहिला टप्पा होता. परंतु हा टप्पा पूर्ण होण्याच्या आधीच लॉकडाऊनचा कालावधी आणखी ७ दिवसांनी वाढवण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही कोरोनाचा प्रकोप काही थांबला नाही. लॉकडाऊन काळात पाच दिवसात तब्बल ४०६१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर ३२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आता अमरावती शहर, अचलपूर शहर आणि अंजनगाव सूर्जी शहरातही ८ मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत कडक निर्बंध असणार आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. त्यानंतरही लॉकडाऊन वाढवून घ्यायचा नसेल तर त्रिसूत्रीचा वापर करा आणि लॉकडाऊन टाळा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या काळात आधीप्रमाणेच जीवनावश्यक वस्तू, औषधांची दुकानं सुरु राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारचा कारभारच बघायला मिळाला नाही, राज ठाकरेंचा टोला

News Desk

लॉकडाऊनच्या काळात सायबर २५८ गुन्हे दाखल, महाराष्ट्र सायबर विभागाची माहिती

News Desk

हर्ड इम्युनिटीमुळे आपल्याकडे लक्षणीयरित्या कोरोना रुग्णांची संख्या कमी – मुख्यमंत्री

News Desk