HW News Marathi
Covid-19

कल्याण डोंबिवलीत ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ! जाणून घ्या नवी नियमावली…

कल्याण | कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा टाळेबंदी करण्यात आली. कल्याण डोंबिवलीमध्ये आज (१९ जुलै) संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. आता कल्याण-डोंबिवली महापालिकेने लॉकडाऊनबाबतची नवी नियमावली जाहीर केली आहे. कल्याण-डोंबिवलीतल्या कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या क्षेत्रांमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे.

मॉल्स, मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स वगळता सर्व भाजी मार्केटसह बाजारपेठा आणि दुकाने पी १, पी २ प्रमाणे म्हणजेच सम-विषम तारखेप्रमाणे सुरू राहणार आहेत. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवलीप्रमाणेच ठाणे आणि मीरा भाईंदरमधल्या हॉटस्पॉट क्षेत्रांमध्येही ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज (१९ जुलै) लॉकडाउन शिथिल करण्यात येत असल्याचे आदेश आयुक्तांनी काढले असून, काही कंटेनमेंट झोन असलेल्या प्रभागांमध्ये लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार आज दिवसभर अन्नत्याग करणार !

News Desk

मुंबईत आज आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

News Desk

देशात २४ तासात ३२,६९५ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर, ६०६ जणांचा झाला मृत्यू

News Desk