HW News Marathi
Covid-19

कोरोनाचा उद्रेक! पवारांच्या बारामतीत ७ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन

बारामती | राज्यात अनेक जिल्ह्यांत, शहरांत कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. याचा फटका पवारांच्या बारामतीलाही लागला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. बारामतीत येत्या बुधवारपासून म्हणजे ५ मेपासून ७ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. बारामतीत ७ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर बारामती प्रशासनाने निर्णय घेतला आहे. ५ ते ११ मे दरम्यान बारामतीत कडक लॉकडाऊन असेल.

बारामतीत दूध विक्रीसाठी सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत मुभा असेल. तर मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. किराणा, भाजी मंडई या काळात बंद राहणार आहे.दरम्यान, गेल्याच आठवड्यात अजित पवार यांनी बारामतीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक घेत बारामती तालुक्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती अजित पवारांनी जाणून घेतली होती. अजित पवार यांनी बारामतीतल्या वाढत्या रुग्ण संख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पुकारलेल्या वीकेंडला लॉकडाऊनला बारामतीत 100 टक्के प्रतिसाद मिळाला होता. मेडिकल आणि दूध विक्री वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या. बारामतीत प्रत्येक चौकात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची बारकाईने पोलिसांकडून चौकशी केली जात होती. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. इतकंच नाही, तर बारामतीत विनाकारण मोकाट फिरणाऱ्या व्यक्तींची ॲंटीजेन तपासणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकल, लग्न समारंभामुळे महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ, केंद्रीय पथकाचा अहवाल

News Desk

राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला

News Desk

दिलासादायक ! अनेक दिवसांनी सुखावणारी आकडेवारी, १ लाखांच्या आत आली नव्या रुग्णांची संख्या 

News Desk